अभिनेता कुणाल खेमूवर प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 15:34 IST
‘सांवरे’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता कुणाल खेमूवर शनीवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला असून त्यात तो जखमी झाला असल्याचे वृत्त आहे. ...
अभिनेता कुणाल खेमूवर प्राणघातक हल्ला
‘सांवरे’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता कुणाल खेमूवर शनीवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला असून त्यात तो जखमी झाला असल्याचे वृत्त आहे. कुणाल खेमू हा आपल्या आगामी ‘सांवरे’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी लखनऊमध्ये गेला होता. त्यावेळी काही लोकांचा इमामबाडेच्या बाहेर नौबतखाण्यात शूटिंग करण्यास विरोध होता. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे तेथील काही लोकांचे म्हणणे होते. मात्र, तरिही शूटिंग चालूच ठेवल्याने एका समूहाने चित्रीकरणाच्या सेटवर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये अभिनेता कुणाल खेमू जखमी झाला असून त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. ‘सांवरे’ चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग सुरु असतानाच हा विरोध करण्यात आल्याचे समजते. या गाण्याला पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान आवाज देत आहेत. ते सुध्दा गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी लखनऊमध्ये आले आहेत.