तब्बल सहावेळा दबंग सलमान खानला रिजेक्ट करणारी ‘ही’ अभिनेत्री ‘किक-२’मध्ये करणार त्याच्याशी रोमान्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 16:40 IST
बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्यासोबत काम करण्यासाठी प्रत्येक अभिनेत्री उत्सुक असते. परंतु एक अभिनेत्री अशी आहे, जी अजूनही त्याच्यासोबत ...
तब्बल सहावेळा दबंग सलमान खानला रिजेक्ट करणारी ‘ही’ अभिनेत्री ‘किक-२’मध्ये करणार त्याच्याशी रोमान्स!
बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्यासोबत काम करण्यासाठी प्रत्येक अभिनेत्री उत्सुक असते. परंतु एक अभिनेत्री अशी आहे, जी अजूनही त्याच्यासोबत झळकली नाही. तिला सलमानसोबत काम करण्याची संधी मिळाली नाही, असेही काही नाही. कारण एक दोनवेळा नव्हे तर तब्बल सहावेळा तिला त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, मात्र प्रत्येकवेळी कुठल्या ना कुठल्या कारणाने तिने ही आॅफर रिजेक्ट केली. मात्र आता ती सलमानच्या आगामी ‘किक-२’मध्ये त्याच्याशी रोमान्स करताना दिसणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ‘ही’ अभिनेत्री कोण? तर ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणीही नसून बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आहे. होय, दीपिका सलमानसाबेत ‘किक-२’मध्ये झळकणार आहे. दरम्यान, सध्या सलमान खान ‘रेस-३’मध्ये कास्ट केल्यामुळे चर्चेत आहे. असे म्हटले जात आहे की, ‘रेस’ सिरीजच्या तिसºया भागात सैफ अली खान नव्हे तर सलमान खान मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे. या व्यतिरिक्त सलमान त्याच्या २०१२ मध्ये आलेल्या ‘किक’ या चित्रपटाच्या दुसºया भागाचीही तयारी करीत आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सुरुवातीला असे म्हटले जात होते की, जॅकलीन फर्नांडिसच यावेळीही सलमानसोबत मुख्य भूमिकेत असेल. मात्र आता जॅकलीनचे नाव बाजूला सारले गेले असून, मस्तानी दीपिकाचे नाव निश्चित करण्यात आले आहे. ‘फिल्मी बीट’च्या रिपोर्टनुसार, जॅकलीन आणि सलमानची जोडी ‘रेस-३’मध्ये बघावयास मिळणार आहे. त्यामुळेच ‘किक-२’मध्ये या दोन्ही स्टार्सला एकमेकांच्या अपोझिट कास्ट केले नाही. त्यामुळे ‘किक-२’मध्ये सलमानसोबत दीपिका रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे. वास्तविक दीपिकाने आतापर्यंत सलमानचे सहा चित्रपट रिजेक्ट केले आहे. त्यामुळे यावेळेस जर दीपिका सलमानसोबत पडद्यावर झळकली तर ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे. दीपिकाने आतापर्यंत ‘सुलतान, किक, प्रेम रतन धन पायो, शुद्धी’ आदी सलमानचे चित्रपट रिजेक्ट केले आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच पडद्यावर झळकणारी ही जोडी बघायला चाहतेही उत्सुक असतील यात शंका नाही.