Join us

​अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध केलं, आता कॅटरिना कैफ बनणार लेखिका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 12:06 IST

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ ही आता बॉलिवूड चांगलीचं स्थिरावलीयं. कॅट बॉलिवूडमध्ये आली तेव्हा तिला बरेच नकार पचवावे लागलेत. अनेकांनी ...

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ ही आता बॉलिवूड चांगलीचं स्थिरावलीयं. कॅट बॉलिवूडमध्ये आली तेव्हा तिला बरेच नकार पचवावे लागलेत. अनेकांनी तिच्या अभिनयावर टीका केली तर अनेकांनी तिला नाचता येत नाही म्हणून, नाकं मुरडली. तिच्या हिंदीबद्दलही लोक नाही नाही ते बोललेतं. पण कॅटरिना जिगरबाज निघाली. तिने ही सगळी टीका पचवत, स्वत:ची अशी काही ओळख निर्माण केली की, लोकांची तोंड बंद झालीत. आज कॅटचे नाव बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते, ते म्हणूनच. कॅटच्या इंडस्ट्रीतील अख्ख्या प्रवासात अनेक वळणे आलीत. हा अख्खा प्रवास वाचायला कुणाला आवडणार नाही? नेमकी हीच बाब हेरून कॅटने बॉलिवूडचा आत्तापर्यंतचा संपूर्ण प्रवास पुस्तकरूपात  चाहत्यांसमोर आणण्याचे मनावर घेतले आहे. होय, चर्चा खरी मानाल तर, कॅट तिच्या बॉलिवूड प्रवासावर पुस्तक लिहिण्याच्या विचारात आहे आणि लवकरच ती या प्रोजेक्टवर काम सुरु करेल, अशी शक्यता आहे. २००३ मध्ये ‘बूम’ या चित्रपटातून कॅटने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. इथपासून तर बॉलिवूडची एक आघाडीची अभिनेत्री या मार्गातील संघर्ष, यश-अपयश असे सगळे कॅटच्या या पुस्तकात वाचायला मिळू शकते. अलीकडे एका मुलाखतीत कॅटने याबद्दलचे अप्रत्यक्ष संकेत दिलेत. बॉलिवूडमध्ये तू स्वत:ला कसे सांभाळले? असा प्रश्न कॅटला या मुलाखतीत केला गेला होता. यावर उत्तर देताना, यासाठी मी स्वत:ला तयार केले. कदाचित या सगळ्यावर मी कधीकाळी पुस्तक लिहिन. त्यामुळे मी तूर्तास या प्रश्नाचे उत्तर देणार नाही, असे कॅट म्हणाली होती. कॅटने हे पुस्तक लिहिलेचं तर ते वाचायला तुम्ही किती उत्सूक असाल, हे आम्हाला नक्की कळवा. नुकतीच सुपरस्टार सलमान खानसोबत ‘टायगर जिंदा है’मध्ये झळकलेली कॅटरिना सध्या दोन मोठ्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.यातला पहिला चित्रपट म्हणजे, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’. यात ती बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय   बॉलिवूडचा किंग शाहरूख खानसोबतही ती ‘झीरो’ या चित्रपटात ती बिझी आहे.ALSO READ : कॅटरिना कैफचा ‘हा’ हॉट व्हिडीओ होतोय वाऱ्यासारखा व्हायरल, पाहा व्हिडीओ!