बॉलिवूडचा अॅक्शन स्टार जॉन अब्राहमच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक वाट पाहत होते, त्या 'फोर्स ३' (Force 3) चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अॅक्शन आणि थ्रिलरने भरपूर असलेल्या या फ्रँचायझीचा तिसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे जॉनसोबत या सिनेमात मोठा सुपरस्टार झळकणार आहे.
'फोर्स ३' या चित्रपटात जॉन अब्राहमसोबत अभिनेता हर्षवर्धन राणे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हर्षवर्धनने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाच्या 'मुहूर्त' सोहळ्याचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटाची संपूर्ण टीम उत्साहात दिसत असून, चित्रीकरणाला अधिकृतपणे सुरुवात झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
फ्रँचायझीचा यशस्वी प्रवास
२०११ मध्ये आलेल्या 'फोर्स' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती, ज्यामध्ये जॉन अब्राहम आणि जिनिलिया डिसूझा मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर २०१६ मध्ये 'फोर्स २' प्रदर्शित झाला, ज्यालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता तब्बल १० वर्षांनंतर या सिनेमाचा तिसरा भाग येत असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 'फोर्स ३' मध्ये जॉन अब्राहम पुन्हा एकदा पोलीस अधिकारी यशवर्धनच्या भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता आहे.
यावेळची अॅक्शन गेल्या दोन भागांच्या तुलनेत अधिक भव्य असेल, असा दावा निर्मात्यांकडून केला जात आहे. हर्षवर्धन राणेची या चित्रपटातील एन्ट्री अॅक्शन प्रेमींसाठी एक विशेष पर्वणी ठरणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु चित्रीकरणाचा वेग पाहता हा चित्रपट २०२७ च्या सुरुवातीला प्रदर्शित होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. जॉन अब्राहमचे फॅन्स सोशल मीडियावर 'एसीपी यशवर्धन इज बॅक' अशा कमेंट्स करून आपला आनंद व्यक्त करत आहेत.
Web Summary : John Abraham's 'Force 3' is officially announced, with Harshvardhan Rane joining the cast. The action-thriller sequel comes 10 years after 'Force 2'. John reprises his role as Yashvardhan. Expected release is early 2027.
Web Summary : जॉन अब्राहम की 'फोर्स 3' की आधिकारिक घोषणा, हर्षवर्धन राणे भी शामिल। एक्शन-थ्रिलर सीक्वल 'फोर्स 2' के 10 साल बाद आ रहा है। जॉन यशवर्धन के रूप में अपनी भूमिका दोहराएंगे। 2027 की शुरुआत में रिलीज होने की उम्मीद।