कलाकारांना आपल्या शूटिंगमुळे आपल्या कुटुंबासोबत फार वेळ घालवता येत नाही. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा जवळपास एक दशकानंतर आपल्या कुटुंबासमवेत नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करणार आहे. अभिषेक कपूरच्या 'चंदीगड करे आशिकी' च्या शूटिंगनिमित्त सध्या तो चंदीगडमध्येच आहे आणि त्याच्यासाठी ही गोष्ट फार आनंदाची आहे. आयुषमान म्हणतो की, तो बर्याच दिवसानंतर कुटुंबासोबत सेलिब्रेशन करणार आहे.
आयुषमान म्हणाला, “मी माझ्या कुटुंबासमवेत चंदीगडमध्ये नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करुन जवळपास एक दशक उलटून गेले. मी लक्की आहे की या वेळी त्याच्यासमवेत ख्रिसमस आणि नवीन वर्षे सेलिब्रेट करण्याची संधी मिळाली आहे.