Join us
Daily Top 2Weekly Top 5

कृती झाली जखमी...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 14:52 IST

 कृती सेनन आणि सुशांतसिंग राजपूत हे दोघे सध्या बुडापेस्टमध्ये ‘राब्ता’ या आगामी चित्रपटाची शूटिंग करत आहेत. त्यांच्या अनेक रोमँटिक ...

 कृती सेनन आणि सुशांतसिंग राजपूत हे दोघे सध्या बुडापेस्टमध्ये ‘राब्ता’ या आगामी चित्रपटाची शूटिंग करत आहेत. त्यांच्या अनेक रोमँटिक सीन्सची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. पण, आता ‘राब्ता’ च्या सेटवरून नवीनच बातमी कळतेय.ती अशी की, कृती सेनन म्हणे जखमी झाली आहे.  एक अ‍ॅक्शन सिक्वेन्स साकारताना तिचा पाय घसरला आणि तिच्या घोट्याला मार बसला आहे. ते हंगेरिया शहरात शूटिंग करत होते. सुत्रांनुसार,‘ चित्रपटाची टीम सध्या दुसरे सीन्स शूट करून घेणार आहेत. नंतर अ‍ॅक्शन सीन्सकडे येणार असल्याचे कळते आहे.कृतीची दुखापत फार काही गंभीर नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापर्यंत शुटींग पुन्हा सुरू होणार असल्याचे कळते आहे. वेल, कृती काळजी घे. आणि गेट वेल सून.’