Join us

अ‍ॅक्शन अन् रोमांसचा ‘बाघी’, ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 00:41 IST

  श्रद्धा आणि टायगर दोघेही बंड करतात यावर आधारित चित्रपट आहे. २९ एप्रिल रोजी चित्रपट रिलीज होणार आहे.

  टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांचा ‘बाघी’ चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाल्यानंतर सर्वत्र त्यांच्या चित्रपटाविषयी चर्चा सुरू झाली होती. सिक्स पॅक असलेला टायगर श्रॉफ आणि हॉट अवतारातील श्रद्धा कपूर यांची केमिस्ट्री यात कशी दिसेल? हा सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय बनली आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून यातील अमेझिंग अ‍ॅक्शन स्किल्स पाहून आश्चर्यचकित व्हायला होणार यात काही शंका नाही. श्रद्धा आणि टायगर दोघेही बंड करतात यावर आधारित चित्रपट आहे. २९ एप्रिल रोजी चित्रपट रिलीज होणार आहे.