Join us

पैशापेक्षा अभिनय महत्त्वाचा - सुशांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:33 IST

छोट्या पडद्यावरून मोठय़ा रुपेरी पडद्यावर स्वत:चे नाव उमटविणार्‍या अभिनेत्यांच्या यादीत सुशांत सिंग राजपूतचा सामावेश होतो. अपयशाने खचून न जाता ...

छोट्या पडद्यावरून मोठय़ा रुपेरी पडद्यावर स्वत:चे नाव उमटविणार्‍या अभिनेत्यांच्या यादीत सुशांत सिंग राजपूतचा सामावेश होतो. अपयशाने खचून न जाता नेहमी शंभर टक्के योगदान देण्यावर तो भर देतो. अभिनय त्याच्यासाठी सगळ्या मोठे पॅशन आहे. म्हणून आर्टिस्टिक चित्रपटांसाठी त्याने अनेक वेळा बिग बजेट चित्रपट नाकारले आहेत. सहज, सोपा आणि प्रामाणिक अभिनयाच्या जोरावर प्रत्येक मोठा निर्माता त्याच्यासोबत काम करू पाहतो. रिलेशनशिपच्या बाबतीतही तो पहिल्यापासून ओपन राहिलेला आहे. यासंबधी तो म्हणतो, 'मी इंजिनिअर, इनवेस्टमेंट बँकर किंवा इतर काहीही बनू शकलो असतो. मात्र केवळ अँक्टिंगसाठी मी या क्षेत्रात आलो आहे. माझ्यासाठी पैशापेक्षा अभिनय जास्त महत्त्वाचा आहे.'