Join us

सहा वर्षांच्या वयात आरोपीने बेल्टने मारहाण करत केला होता बलात्कार! डेजी इराणी यांनी ६१ वर्षांनंतर सांगितली आपबीती!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 11:57 IST

टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत अनेक प्रकारच्या भूमिका साकारणा-या अभिनेत्री डेजी इराणी यांनी आपल्या आयुष्याची अनेक रहस्ये उघड केली आहेत. ती ...

टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत अनेक प्रकारच्या भूमिका साकारणा-या अभिनेत्री डेजी इराणी यांनी आपल्या आयुष्याची अनेक रहस्ये उघड केली आहेत. ती जाणून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. १९५० मध्ये बालकलाकार म्हणून डेजी यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. कुरळे केस आणि बोलके डोळे असलेल्या या चिमुकल्या डेजीने सगळ्यांचीचं मने जिंकली. पुढे डेजी यांनी सिनेसृष्टीत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. आज डेजी ६७ वर्षांच्या आहेत. मुंबई मिरर’च्या एका मुलाखतीत, ६७ वर्षांच्या डेजी यांनी आपल्या आयुष्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केलाआहे. ‘मी टू ’मोहिमेअंतर्गत जगभरात महिलांविरोधातील लैंगिक शोषणावर चर्चा सुरु आहे. डेजी यांनीही या चर्चेत भाग घेत, स्वत:सोबतचा एक प्रसंग  सांगितला. सहा वर्षांच्या वयात डेजी यांच्यावर बलात्कार झाला होता. त्यावेळी त्या  मद्रासमध्ये (आत्ताचे चेन्नई) ‘हम पंछी एक डाल के’  या चित्रपटाच्या शूटींग करत होत्या. बलात्कार करणारा डेजी यांच्या ओळखीचा होता. तो सहा वर्षांच्या डेजीला एका हॉटेलात घेऊन गेला आणि तिने त्याने चिमुकल्या डेजीला बेल्टने प्रचंड मारले आणि बलात्कार केला. ही गोष्ट कुणाला सांगितली तर जीवे मारेल, अशी धमकीही त्याने दिली. डेजी सांगतात, त्यावेळी मी खूप लहान होते. पण तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यापुढे येतो. त्याने मला ज्याप्रकारे बेल्टने मारले होते, ती आठवण आजही माझ्या अंगावर काटा आणते. आज तो आरोपी हयात नाही. त्याचे नाव नजर होते. तो सुप्रसिद्ध गायिका जोहराबाई अंबालेवाली यांचा नातेवाईक होता. इंडस्ट्रीत त्याची मोठी ओळख होती. त्यामुळे मी घाबरले होते. मी आईला सुद्धा ही घटना सांगू शकले नाही. १५ वर्षांची असताना मला आईने निर्माता मालिकचंद कोचर यांच्याभेटीलापाठवले. मी एका रात्रीत स्टार बनावे आणि मला कोचर यांच्या ‘मेरे हुजूर’मध्ये काम मिळावे, अशी तिची इच्छा होती. त्यामुळे तिने मला साडीत पाठवले होते. मी त्या निर्मात्याला भेटायला गेले तेव्हा त्याने मला सोफ्यावर बसवले आणि मला स्पर्श करणे सुरू केले. त्याच्या डोक्यात काय सुरू आहे, हे मला कळले. मी तिथून कशीबशी पळाले. या सर्व घटना बघता, मला आणि माझी बहीण हनी इराणी आम्हा दोघींनाही आमचे लग्न व्हावे आणि लवकरात लवकर  घर सोडावे, असे वाटत होते.डेजी तिन्ही बहिणींत सर्वात मोठ्या आाहेत.  हनी सिंह (फरहान आणि जोया अख्तर यांची आई) व मेनका (साजिद व फराह खानची आई) या त्यांच्या दोन बहिणी. डेजी यांनी ५० पेक्षा अधिक चित्रपटांत काम केले आहे. त्या अखेरच्या ‘हॅपी न्यू ईयर’मध्ये दिसल्या होत्या.