Join us

गोविंदाने डेव्हिड धवनवर लावला हा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 11:11 IST

गोविंदा आणि डेव्हिड धवन हे एकेकाळी एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. त्या दोघांच्या जोडीने कुली नं.1, हिरो नं 1 ...

गोविंदा आणि डेव्हिड धवन हे एकेकाळी एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. त्या दोघांच्या जोडीने कुली नं.1, हिरो नं 1 यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहे. डेव्हिडने दिग्दर्शित केलेल्या 17 चित्रपटांमध्ये गोविंदाने काम केले आहे. डेव्हिड धवनचा चित्रपट म्हटला की, त्यात गोविंदाची प्रमुख भूमिका असणारच असे जणू समीकरणच बनले होते. पण गेल्या काही वर्षांपासून गोविंदा आणि डेव्हिड धवनच्या जोडीचा एकही चित्रपट आपल्याला पाहायला मिळालेला नाही. तसेच एकेकाळचे अतिशय जवळचे मित्र समजले जाणारे गोविंदा आणि डेव्हिड धवन आता एकमेकांचे तोंडदेखील पाहात नाही. याविषयी गोविंदा सांगतो, "डेव्हिडसोबत मी 17 चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपण अठरावा चित्रपट करूया असे मी त्याला बोललो होतो. त्यासाठी मी त्याला एक कथादेखील ऐकवली होती. त्याला माझी ती कथा खूपच आवडली होती. पण ही कथा घेऊन त्याने ऋषी कपूर यांच्यासोबत चष्मे बहाद्दूर हा चित्रपट केला. मी ज्यावेळी डेव्हिडला याबाबत विचारले तेव्हा या कथेला घेऊन मी खूप चांगला चित्रपट बनवणार असल्याचे त्याने मला सांगितले. त्यावर ही फसवणूक असल्याचे मी त्याला बोललो होतो. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर माझ्याच कथेवर तू चित्रपट बनवत असल्याने त्या चित्रपटात मला एखादी छोटी तरी भूमिका दे अशी मी त्याला विनंती केली होती. पण त्याने तसेदेखील केले नाही. तू मला चित्रपटात घेतले नाही तर पुढील सात वर्षं मी तुझ्याशी बोलणार नाही असेदेखील मी डेव्हिडला बोललो होतो. पण याचादेखील त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मी त्याच्याशी बोललेलो नाही. केवळ डेव्हिडच नाही तर या इंडस्ट्रीतील अनेक जणांचा मी वाईट अनुभव घेतला आहे. माझे चित्रपट फ्लॉप होत असताना कोणीही येऊन मला उपदेश देत असत. दारुत रोज बुडणारे लोक मला तू शुद्धीत राहात जा असे सांगायचे आणि जे दिवसाप्रमाणे प्रेयसी बदलतात ते येऊन मला चरित्राचे धडे द्यायचे. या सगळ्या गोष्टीचा मला प्रचंड मनस्ताप झाला होता."