Join us

यामीच्या मते ती ‘अनरोमँटिक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 16:07 IST

अभिनेत्री यामी गौतमला इंटिमेट सीन करताना खूपच अनरोमँटिक वाटते. यामीचा जुनुनियत हा चित्रपट येत असून, या चित्रपटात पुलकित सम्राट ...

अभिनेत्री यामी गौतमला इंटिमेट सीन करताना खूपच अनरोमँटिक वाटते. यामीचा जुनुनियत हा चित्रपट येत असून, या चित्रपटात पुलकित सम्राट मुख्य भूमिकेत आहे.‘पडद्यावर रोमँटिक सीन करताना खूपच अवघडल्यासारखे होते. आम्ही अत्यंत थंड वातावरणात, वाईट हवामान स्थितीत शुटींग केले. अशा वातावरणात शुटींग करणाºया कलाकारांविषयीचा आदर अधिक वाढतो’, असे यामी म्हणाली.‘कोणत्याही कलाकारांमधील संबंध चांगले असणे चित्रपटासाठी उत्तम बाब असते. यामुळे काम खूप छान होते, असे तिने सांगितले.पडद्यावरील केमेस्ट्री चांगली असावी यासाठी बरेच जण यावर लक्ष देतात. तुम्ही जर त्याकडेच लक्ष द्यायला लागला तर काम व्यवस्थित होत नाही. जर तुम्ही यांत्रिकी पद्धतीने काम करणार असाल ते योग्य नव्हे. पुलकितसोबत सनम रे या चित्रपटात काम केले आहे. आमचे कौतुकही झाले. आम्ही याकडे चांगली बाब म्हणून पाहतो. भविष्यात काय होईल, हे सांगता येत नाही, असे यामी म्हणाली.