Join us

ऋषी कपूर सांगतायेत, लोकांनाच स्टार किड्सना पाहायची उत्सुकता असते

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 15:54 IST

नेपोटिझम वाद बॉलिवूडमध्ये सध्या चांगलाच गाजत आहे. कंगना राणौतने बॉलिवूडमधील असलेल्या नेपोटिझमवर काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या कॉफी विथ करण ...

नेपोटिझम वाद बॉलिवूडमध्ये सध्या चांगलाच गाजत आहे. कंगना राणौतने बॉलिवूडमधील असलेल्या नेपोटिझमवर काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात वक्तव्य केले होते आणि तिथून हा वाद सुरू झाला. नेपोटिझम बद्दल सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार आपली मते व्यक्त करत आहेत. कपूर कुटुंब हे बॉलिवूडमधील सगळ्यात फेमस कुटुंबापैकी एक आहे. या कुटुंबातील अनेकजणांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आपली एक जागा निर्माण केली आहे. आज करिना कपूर, करिश्मा कपूर, रणबीर कपूर यांच्या रूपाने या कुटुंबाची चौथी पिढी बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. नेपोटिझमवर नुकतेच ऋषी कपूर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते सांगतात, नेपोटिझमचे काही फायदे आहेत तर काही तोटे आहेत. तसेच नेपोटिझम केवळ बॉलिवूडमध्ये आहे असे नाही तर सगळ्याच क्षेत्रात आपल्याला नेपोटिझम पाहायला मिळते. आज भारतात राजकारण, बिझिनेस या सगळ्याच क्षेत्रात नेपोटिझम अस्तित्वात आहे. वारस जबाबदारी पेलण्यासाठी योग्य असो व नसो त्याच्याकडे व्यवसायाची जबाबदारी दिली जाते हे आजवर आपण सगळ्यांनीच पाहिले आहे. पण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे नाहीये. तुमचा वारस तुम्ही लोकांवर थोपवू शकत नाही. राज कपूर हे सगळ्यात यशस्वी स्टार पुत्र होते असे मी म्हणेन. पृथ्वीराज कपूर हे स्वतः एक खूप चांगले कलाकार होते. त्यांच्यानंतर त्यांचा हा वारसा राज कपूर यांनी पुढे नेला. पण राज कपूर हे पृथ्वीराज कपूर यांचे वारसदार होते म्हणून त्यांनी यश मिळवले असे नक्कीच म्हणता येणार नाही. ते त्यांच्यात असलेल्या कलागुणांमुळे यशस्वी ठरले. मी गेल्या ४०-४५ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. आजही मला खूप चांगल्या भूमिका ऑफर केल्या जात आहे. मी राज कपूर यांचा मुलगा आहे म्हणून मला काम मिळते का? तर तसे नाहीये. रणबीरदेखील गेल्या दहा वर्षांपासून बॉलिवूडमध्ये खूप चांगले काम करत आहे. आमच्यात असलेल्या कलागुणांमुळे आम्ही प्रगती केली आहे. आम्ही कोणाची मुले आहोत म्हणून आम्हाला कामं नक्कीच मिळत नाहीत. सगळेच स्टार पुत्र यशस्वी होतात असेही नाहीये. आज अनेक स्टार पुत्र अयशस्वी ठरले आहेत. सामान्य लोक ज्याप्रकारे एखाद्या राजकारणाची निवड करतात. तसेच ते आमची निवड करतात. एखाद्या स्टार कलाकाराच्या मुलाला अथवा मुलीला मोठ्या पडद्यावर पाहाण्याची लोकांनाच इच्छा असते. स्टार पुत्र असणे हे एकप्रकारचे ओझे असते. कारण तुमची तुलना प्रेक्षक तुमच्या आई-वडिलांशी करत असतात आणि तुमच्यात तुमच्या पालकांसारखे गुण नसल्यास ते तुम्हाला पहिल्याच चित्रपटानंतर विसरून जातात. Also Read :  कंगना राणौतने ‘नेपोटिझम’वर ओपन लेटर लिहित सैफ अली खानला पाजले डोस!