प्रियांकाच्या मागणीनुसार,‘बेवॉच’च्या स्क्रीप्टमध्ये बदल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 21:33 IST
अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’मुळे प्रियांका चोप्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. पुढीलवर्षी प्रियांकाचा ‘बेवॉच’ हा हॉलिवूड ...
प्रियांकाच्या मागणीनुसार,‘बेवॉच’च्या स्क्रीप्टमध्ये बदल?
अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’मुळे प्रियांका चोप्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. पुढीलवर्षी प्रियांकाचा ‘बेवॉच’ हा हॉलिवूड सिनेमाही प्रदर्शित होत आहे. यात प्रियांका विलेनच्या भूमिकेत दिसणार आहे. कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल,पण या चित्रपटात प्रियांकाला विलेनच्या भूमिकेत पाहणेही एक्साईटिंग असणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बेवॉचमध्ये प्रियांकाचे जी भूमिका आहे, ती मेल अॅक्टरसाठी लिहिण्यात आली होती. अर्थात यानंतर प्रियांकासाठी चित्रपटाची अख्खी स्क्रिप्टच बदलण्यात आली. ताज्या बातमीनुसार, बेवॉचच्या डायरेक्टरने प्रियांकाला विलेनची भूमिका आॅफर केली नव्हतीच. खुद्द प्रियांकाने या चित्रपटात विलेनची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली आणि मग प्रियांकाच्या मागणीनुसार चित्रपटाची स्क्रिप्ट बदलण्यात आली. आहे ना आपली प्रियांका हुश्शार!!