Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ऐश्वर्या रायच्या मते हा अभिनेता आहे बॉलिवूडमधील सेक्सिएस्ट मेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 16:04 IST

बॉ़लिवूडमधील सेक्सिएस्ट अभिनेता कोण आहे असे तुम्हाला विचारले तर सलमान खान, आमिर खान, हृतिक रोशन, अक्षय कुमार यांसारखी अनेक ...

बॉ़लिवूडमधील सेक्सिएस्ट अभिनेता कोण आहे असे तुम्हाला विचारले तर सलमान खान, आमिर खान, हृतिक रोशन, अक्षय कुमार यांसारखी अनेक अभिनेत्यांची तुम्ही नावे घ्याल. पण अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या मते कोणता अभिनेता सगळ्या सेक्सिएस्ट आहे हे तुम्हाला माहीत आहे का? ऐश्वर्य़ाने स्वतःनेच सिमी गरेवाल यांच्या रँद्व्ह्यू विथ सिमी गरेवाल या कार्यक्रमात त्या अभिनेत्याचे नाव सांगितले होते.ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचे प्रेमप्रकरण सगळ्यांनाच माहीत आहे. हम दिल दे चुके समन या चित्रपटाच्या वेळी या दोघांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. ते अनेक समांरभात, पार्टीत एकत्र पाहायला मिळत असत. त्यामुळे ते दोघे लग्न करणार असेच सगळ्यांना वाटत होते. पण अचानक त्या दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर त्या दोघांमध्ये इतका दुरावा निर्माण झाला की, ऐश्वर्याने सलमानशी न बोलणेच पसंत केले. आज ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चन सोबत लग्न केले असून त्या दोघांना एक मुलगी देखील आहे. ती आपल्या संसारात खूपच खूश आहे तर सलमानने लग्न न करणेच पसंत केले आहे. पण आज इतकी वर्षं झाली तरी त्यांचे फॅन्स त्याची प्रेमकथा विसरू शकलेले नाहीत.ऐश्वर्याने अनेक वर्षांपूर्वी सिमी गरेवाल यांच्या रँद्व्ह्यू विथ सिमी गरेवाल या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी या कार्यक्रमाची होस्ट सिमी गरेवाल यांनी ऐश्वर्याला एक प्रश्न विचारत चांगलेच कोड्यात टाकले होते. सिमी गरेवाल यांनी ऐश्वर्याला विचारले होते की, तुझ्यामते सगळ्यात सेक्सिएस्ट मेन कोण आहे? या प्रश्नावर हसत सेक्सिएस्ट मेन ऐवजी चार्मिंग मेन कोण आहे असे मी सांगितले चर चालेल का असा प्रश्न ऐश्वर्याने विचारला होता. तसेच नाव सांगणे खूपच कठीण आहे असे देखील ती म्हणाली होती. पण नंतर काहीच सेकंदात तिने त्या व्यक्तीचे नाव सांगितले होते. जगानेच ज्याला आपल्या देशातील सगळ्यात सेक्सिएस्ट मेन मानले आहे त्याचेच मी नाव घेईन असे म्हणत ती सलमान खान असे म्हटली होती. त्यावर सिमी यांनी देखील सलमान दिसायला खूपच छान असल्याचे म्हटले होते. Also Read : बॉक्स आॅफिसवर ‘टायगर जिंदा है’चा जोर कायम; ४०० कोटींच्या क्लबमध्ये केली एंट्री!