आमिरच्या मते, गुरदत्तचा काळ भारतीय सिनेमाचे सुवर्णयुग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 21:10 IST
माझा जन्म गुरुदत्तच्या काळात व्हायला हवा होता, तो काळ भारतीय सिनेमाचे सुवर्ण युग होते, असे मत बॉलिवूड अभिनेता आमिर ...
आमिरच्या मते, गुरदत्तचा काळ भारतीय सिनेमाचे सुवर्णयुग
माझा जन्म गुरुदत्तच्या काळात व्हायला हवा होता, तो काळ भारतीय सिनेमाचे सुवर्ण युग होते, असे मत बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने व्यक्त केलेय. त्यावेळचा सिनेमा नव्या युगातून जात होता. यामुळे सामाजिकदृष्ट्या व कलात्मकदृष्ट्या तो काळ चांगला होता असेही तो म्हणाला. याच काळात माझा जन्म व्हायला हवा होता, असेही तो म्हणाला. नासीर हुसैन यांच्या जीवनावर आधारित ‘म्युझिक मस्ती मॉडर्निटी : द सिनेमा आॅफ नासीर हुसैन’ या पुस्तकाच्या विमोचना दरम्यान त्याने हे मत मांडले. सिनेमाच्या विविध काळावर त्याने आपले विचार मांडले. आमिर म्हणाला, भारत स्वातंत्र्य झाल्यावर सिनेमातही बरेच काही बदल घडले. या काळात तयार झालेले चित्रपटांनी देशांत एका क्रांतीला जन्म दिला. यामुळेच सिनेमाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोण बदलला. लोकांमध्ये सिनेमाने एक नवी संवेदना जागविली. 1960 चे दशक भारतीय सिनेमासाठी सुवर्णयुगच म्हणायला हवा. या काळातील सिनेमात वास्तविकता होती, त्यावेळी संपूर्ण देश सामाजिक बदलांतून जात होता. देशात संघर्ष होता. फाळणी झाली होती. यामुळे संपूर्ण पिढी रचानात्मकतेच्या नव्या विश्वात वावरत होती. साहिर लुधियानवी, मजरुह सुल्तानपुरी हे याच काळातील आहे. मला नेहमीच असे वाटते की मी त्या काळात जन्म घ्यायला हवा होता. के. आसिफ, गुरुदत्त यांनी आपल्या चित्रपटातून नव्या विषयांना मांडले. एवढेच नव्हेतर त्यांना आपल्या चित्रपटांमध्ये नव्या तंत्रज्ञानाचाही पुरेपूर वापर केला. गुरुदत्त यांनी प्यासा, काजग के फुल, साहेब बिबी और गुलाम यासारखे दर्जेदार चित्रपट तयार करून भारतीय सिनेमाला नवी उंची प्रदान केली, असेही तो म्हणाला. आमिर खान या काळातील सामाजिक भान असलेला अभिनेता म्हणून ओळख मिळवित आहे. टीव्हीवर प्रसारित होणारा त्याचा सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या माध्यामतून समाजिक प्रश्नांवर तोेडगा काढण्याचे काम तो करीत आहे. हे विशेष.