Join us
Daily Top 2Weekly Top 5

मान्यता दत्तने पुन्हा एकदा शेअर केला बिकनीतील हॉट लूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2017 13:17 IST

मान्यता दत्तचे ताजे फोटो पुन्हा चर्चेत आहेत. आपल्या चाहत्यांना रिझवण्यासाठी मान्यताने पुन्हा एकदा स्वत:चे बिकनी फोटो शेअर केले आहेत. ब्ल्यू कलरच्या बिकनीत ती अतिशय हॉट दिसतेय.

संजू बाबाची सौभाग्यवती मान्यता दत्त सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव राहते. मान्यता सोशल मीडियावर रोज नव नवे हॉट फोटो पोस्ट करते. हेच फोटो मग मीडियात हॉट न्यूज बनून गाजतात. होय, मान्यताचे ताजे फोटो पुन्हा चर्चेत आहेत. आपल्या चाहत्यांना रिझवण्यासाठी मान्यताने पुन्हा एकदा स्वत:चे बिकनी फोटो शेअर केले आहेत. ब्ल्यू कलरच्या बिकनीत ती अतिशय हॉट दिसतेय. सध्या मान्यता संजय व आपल्या दोन्ही मुलांसोबत फ्रान्समध्ये सुट्टी एन्जॉय करतेय. या हॉलिडेची क्षणाक्षणाची बातमी ती सोशल मीडियावर पोस्ट करते आहे.‘भूमी’ या चित्रपटाचे शूटींग संपल्यानंतर लगेच संजय आपल्या कुटुंबासोबत फ्रान्सला रवाना झाला. सोशल मीडियावर मान्यताने शेअर केलेल्या फोटोत संजय व मान्यता दोघेही परफेक्ट कपलप्रमाणे दिसत आहेत. अलीकडे संजय दत्त ‘भूमी’च्या शूटींगमध्ये बिझी असताना, मान्यता दोन्ही मुलांना घेऊन अचानक सेटवर पोहोचली होती. या सरप्राईजने संजय भलताच खूश झाला होता.मान्यता ही संजयची तिसरी पत्नी आहे. पहिली पत्नी ऋचा शर्मा हिच्या निधनानंतर संजूबाबाने रिया पिल्लई हिच्यासोबत दुसरे लग्न केले होते. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. काही वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर २००८ मध्ये संजयने घरच्यांच्या विरोधात जात मान्यताशी तिसरे लग्न केले. या दोघांच्या वयात सुमारे २० वर्षांचे अंतर आहे. संजूबाबाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ‘भूमी’शिवाय तो आरंभ सिंग यांच्या ‘मलंग’ या चित्रपटातही  बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात संजय दत्तच्या अपोझिट ऐश्वर्या राय-बच्चन दिसणार असल्याची चर्चा आहे. अर्थात अद्याप ऐश्वर्याच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही.