Join us

‘द रिंग’ च्या सेटवर डॅडीसोबत अबराम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 11:32 IST

शाहरूख खानचा सर्वांत लहान मुलगा अबराम आता चित्रपटांच्या सेटसाठी काही नवा नाही. सध्या शाहरूख खान त्याचा आगामी चित्रपट ‘द ...

शाहरूख खानचा सर्वांत लहान मुलगा अबराम आता चित्रपटांच्या सेटसाठी काही नवा नाही. सध्या शाहरूख खान त्याचा आगामी चित्रपट ‘द रिंग’ चित्रपटाचे अ‍ॅमस्टरडॅम येथे शूटींग करतो आहे. त्याच्या सेटवर अबराम आल्याने शाहरूख फारच खुश झाला.सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. त्यात अबराम आल्याने शाहरूख फार खुश दिसत असल्याचे दिसतेय. चित्रपटात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत असून ती एका गुजराती युवतीची भूमिका साकारत आहे. ‘रब ने बना दी जोडी’ नंतरचा ‘द रिंग’ हा दुसरा चित्रपट  आहे.