Join us

सलमान-लुलियासाठी अभिषेकने घेतला पुढाकार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 10:12 IST

 वेल, तुम्हाला वाचून थोडासा धक्काच बसला असेल ना? प्रिती-जेने यांच्या लग्नाच्या बॅशमध्ये सलमान खान आणि लुलिया हे ‘अ‍ॅज अ ...

 वेल, तुम्हाला वाचून थोडासा धक्काच बसला असेल ना? प्रिती-जेने यांच्या लग्नाच्या बॅशमध्ये सलमान खान आणि लुलिया हे ‘अ‍ॅज अ कपल’ म्हणून आले होते. तेव्हा म्हणे अभिषेकने सलमान आणि लुलिया यांना एकत्र डान्स करण्यास म्हणण्यासाठी पुढाकार घेतला.दक्षिण मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित या पार्टीत बॉलीवूडमधील विविध सेलिब्रिटी आपापल्या जोडीदारांसोबत येथे आलेल्या होत्या. तिथे सलमान खान त्याची गर्लफ्रेंड लुलिया वंतुरसोबत आलेला होता. सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागून राहिले होते.तेव्हा अहो आश्चर्यम म्हणजे काय तर? सलमान आणि लुलियाला अभिषेक बच्चन याने पुढे होऊन एकत्र डान्स करण्यास सांगितले. ऐश्वर्या कान्समध्ये गेल्याने अभिषेक एकटाच जेने-प्रितीच्या रिसेप्शनला आला होता. जेव्हा सलमानने सल्लूमियाँला पाहिले तेव्हा त्याने त्याला ओढून त्याची गर्लफ्रेंड लुलियासोबत डान्स करण्यास सांगितले.त्यानंतर ते दोघे डान्सफ्लोव्हर जाऊन डान्स करू लागले तेव्हा शाहरूख खानने त्यांना पहाटे २ वाजता जॉईन केले. सलमान-लुलियासोबत तिथे लव्हबर्ड्स युवराज सिंग आणि त्याची प्रेयसी हेजल कीच देखील होते.