Join us

​अभिषेक म्हणाला, ऐश्वर्या व मीे एकमेकांवर किती प्रेम करतो, हे आम्हाला ठाऊक आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 16:55 IST

अलिकडे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या सर्वकाही आॅलवेल नसल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या.   मात्र याऊपरही अभि-ऐश सोबत ...

अलिकडे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या सर्वकाही आॅलवेल नसल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या.   मात्र याऊपरही अभि-ऐश सोबत दिसत राहिले. अर्थात मीडियात आलेल्या बातम्यांवर दोघांपैकी कुणीही खुलासा केला नव्हता. पण ‘हाऊसफुल ३’च्या सक्सेस एन्जॉय करीत असलेल्या अभिषेकने यावर चुप्पी तोडली आहे. एका आॅनलाईन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने मीडियाने पेरलेल्या बातम्या बकवास असल्याचे सांगितले. मीडियात माझ्या व ऐश्वर्याबद्दलच्या अलीकडच्या बातम्या मी वाचल्या. पण खरे काय, हे मला ठाऊक आहे. शिवाय मीडियाला किती गंभीरपणे घ्यायचे हेही मला ठाऊक आहे. माझ्या व ऐश्वर्याच्या वैवाहिक आयुष्यात थर्ड पार्टीची ढवळाढवळ मी खपवून घेणार नाही. आम्ही कसे आहोत, कसे वागावे हे कुणीही तिसरे आम्हाला सांगू शकत नाही. मी तिच्यावर किती प्रेम करतो, हे ऐश्वर्या जाणून आहे आणि ती माझ्यावर किती प्रेम करते, ते मला ठाऊक आहे. माझ्या वैवाहिक आयुष्याबद्दल मीडिया काय बोलते, याच्याशी म्हणून आम्हाला काहीही देणेघेणे नाही. पब्लिक मटेरिअल असल्याने मीडियात आमच्याबद्दल छापून येणारच. पण म्हणून  मीडियात छापून आलेल्या अशा  गोष्टींनी आम्हाला काहीही फरक पडत नाही, असे अभिषेक म्हणाला. व्वा, अभिषेक, रिअली यु आर अ परफेक्ट हबी..!!