Join us

​अभिषेक प्रितीला म्हणाला, ‘दूर रहो’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 17:37 IST

करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’चा टीजर रिलीज झाला आणि सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु झाली. रणबीर कपूर आणि ...

करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’चा टीजर रिलीज झाला आणि सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु झाली. रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्यातील हॉट सीन्सची बरीच चर्चा झाली. या हॉट सीन्समुळे बच्चन कुटुंब नाराज असल्याच्याही बातम्या आल्या. पण ‘ऐ दिल है मुश्किल’चा टीजरची मात्र बॉलिवूडमधील अनेकांनी प्रशंसा केली. आता प्रिती झिंटा हिचेच बघा ना! ‘ऐ दिल है मुश्किल’चा टीजर पाहिला आणि प्रिती ऐश्वर्याच्या प्रेमात पडली.एवढेच नाही तर ही गोष्ट तिने ऐश्वर्याचा पती अभिषेकलाही सांगितली ‘ऐ दिल है मुश्किल...चा टीजर पाहून मी अक्षरश: ऐश्वर्याच्या प्रेमात पडले आहे. वाचवं...,’ असा मॅसेज प्रितीने अभिषेकला पाठवला. आता कुणीतरी आपल्या बायकोच्या प्रेमात पडलेले कुठल्याही पुरूषाला कसे बरे आवडेल? अभिषेकनेही प्रितीच्या या tweetला लगेच उत्तर देत तिला सावध केले. ‘ओए!! दूर रहो Z (झिंटा). ती आधीच माझी झाली आहे,’असे अभिषेकने प्रितीला बजावले. अर्थात हे सगळे गमती गमतीत हं!!}}}}