Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या वृत्तावर भडकला होता अभिषेक बच्चन, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 12:06 IST

अभिषेक बच्चन तीव्र संताप व्यक्त करत म्हणाला होता की, नात्यात तिसऱ्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अफवा पसरली होती की त्या दोघांच्या नात्यात कटुता आली आहे. कारण एका इव्हेंटमधील एक जुना व्हि़डीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन वेगळे होण्याचा विचार करत असल्याचीही चर्चा रंगली होती. याबद्दल अभिषेक बच्चनला एका मुलाखतीत विचारल्यानंतर तो म्हणाला की, मला माहित आहे सत्य काय आहे आणि मीडियाकडे किती गांभीर्याने पहायचे. 

तो पुढे बोलताना म्हणाला की, त्यांच्या नात्यात तिसऱ्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. त्याला हेही सांगण्याची गरज नाही की, त्याने त्याचे आयुष्य कसे जगावे. पत्नीला माहित आहे की, त्याचे तिच्यावर किती प्रेम आहे. काही लोक त्यांच्या चांगल्यासाठी काही चुकीचे वृत्त देत असतील तर द्या. मी एक पब्लिक फिगर आहे. सोशल मीडियाला तो खूश करू शकत नाही.

अभिषेक बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच तो ब्रीथ 2 या आगामी चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय त्याने बॉब बिस्वास या सिनेमाचेही शूटिंग सुरू केली होती. मात्र लॉकडाउनमुळे सर्व शूटिंग थांबले आहे.

टॅग्स :अभिषेक बच्चनऐश्वर्या राय बच्चन