Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘जनता कर्फ्यू’बद्दल बोलला अन् फसला़, नेटक-यांनी घेतली अभिषेक बच्चनची मजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 16:24 IST

का ट्रोल झाला अभिषेक?

महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन म्हणायला अनेक वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत आहे. पण या अनेक वर्षांत यशाने त्याला कायम हुलकावणी दिली. फ्लॉपचा शिक्का माथी बसलेला अभिषेक यावरून अनेकदा ट्रोल झाला. मात्र दरवेळी अभिषेकने आपल्या उत्तराने ट्रोलर्सची बोलती बंद केली. ताजे प्रकरणही असेच.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अभिषेकने एक सल्ला दिला. पण हा सल्ला देताच नेटक-यांनी त्याला ट्रोल करणे सुरु केले.

‘सुरक्षित राहा, आनंदी राहा, जबाबदार बना,’ असे अभिषेकने ट्विट केले. त्याच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली.एका युजरने तर अभिषेकला असे काही डिवचले की, त्याचे शब्द अभिषेकच्या जिव्हारी लागले.

 होय, ‘डियर अभिषेक बच्चन या अशांत काळात घरी कसे बसावे, हे तू लोकांना शिकवायला हवेस. कारण तुझ्याकडे याचा मोठा अनुभव आहे,’ असे या युजरने अभिषेकची खिल्ली उडवताना लिहिले. विशेष म्हणजे, ही गंमत फार मनावर घेऊ नकोस. तसा मी तुझा खूप मोठा चाहता आहे, हे लिहायलाही हा युजर विसरला नाही.युजरचे हे शब्द अभिषेकच्या चांगलेच जिव्हारी लागलेत. मग काय त्यानेही उत्तर दिले़ ‘खूप खूप धन्यवाद़ पण सर, खूप आदराने सांगू इच्छितो की, ही वेळ दुस-याला टार्गेट करण्याची वा त्याची खिल्ली उडवण्याची नाही. स्वत:ची व कुटुंबाची काळजी घे. लोकांसाठी आदर्श निर्माण कर,’ असे अभिषेकने लिहिले. वडिलांइतका यशस्वी नसला तरी मी ज्युनिअर बच्चन आहे, हेच अभिषेकने आपल्या या उत्तरातून दाखवून दिले. 

टॅग्स :अभिषेक बच्चनकोरोना वायरस बातम्या