रितेश देशमुखचं दिग्दर्शन असलेल्या 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. सोमवारी(२० एप्रिल) मुंबईत 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी 'राजा शिवाजी' सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चननेही 'राजा शिवाजी'च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावली होती. लग्नाचा वाढदिवस असूनही अभिषेक या सोहळ्याला उपस्थित होता.
रितेश आणि जिनिलीयाने अभिषेक-ऐश्वर्या बच्चनला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याचा व्हिडीओ जिनिलीयाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश-जिनिलीयासोबत अभिषेक बच्चनही दिसत आहे. "हॅपी अॅनिव्हर्सरी दादा-वहिनी", असं म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओला जिनिलियाने कॅप्शनही दिलं आहे. ती म्हणते, "अभिषेक दादा मला तुमचं नेहमी कौतुक वाटतं. तुमच्याकडून रोज काहीतरी नवीन शिकायला आवडेल. काल तुमच्या लग्नाचा वाढदिवस होता तरीदेखील तुम्ही आमच्यासाठी आलात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐश्वर्याजींनीही या निर्णयात तुम्हाला साथ दिली. आयुष्यातील या खास दिवशी तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून कार्यक्रमासाठी हजेरी लावली त्यासाठी खूप आभार. मी तुम्हा दोघांचीही ऋणी राहीन. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दादा-वहिनी".
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात अभिषेक बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. रितेश देशमुख छत्रपती शिवराय तर जिनिलिया राणी सईबाईंच्या भूमिकेत आहे. याशिवाय संजय दत्त, विद्या बालन, फरदीन खान, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा येत्या १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.
Web Summary : Abhishek Bachchan attended the 'Raja Shivaji' trailer launch, directed by Riteish Deshmukh, despite his wedding anniversary. Genelia and Riteish wished Abhishek and Aishwarya. Abhishek plays Sambhaji Maharaj in the film, releasing May 1.
Web Summary : अभिषेक बच्चन शादी की सालगिरह के बावजूद रितेश देशमुख द्वारा निर्देशित 'राजा शिवाजी' के ट्रेलर लॉन्च पर पहुंचे। जेनेलिया और रितेश ने अभिषेक और ऐश्वर्या को बधाई दी। अभिषेक फिल्म में संभाजी महाराज की भूमिका निभा रहे हैं, जो 1 मई को रिलीज हो रही है।