Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाप अस्पताल में भर्ती...! अमिताभ यांच्यानंतर हेटर्सने अभिषेक बच्चनला डिवचले, ज्युनिअर बच्चन म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 17:06 IST

अमिताभ संतापले पण अभिषेकने अशी केली बोलती बंद...

ठळक मुद्देअलीकडे एका युजरने अमिताभ यांच्यासाठी नको ते लिहिले होते. ‘माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही कोरोनामुळे मरावे,’ असे या व्यक्तिने लिहिले होते.

अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन सध्या कोरोनाशी झुंज देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघेही मुंबईच्या नानावटी रूग्णालयात भरती आहेत. एकीकडे चाहते या दोघांसाठी प्रार्थना करत आहेत. दुसरीकडे काही हेटर्स या बापलेकांना ट्रोल करण्याची संधी साधत आहेत. अलीकडे एका व्यक्तिने अमिताभ यांना ट्रोल केले होते. या ट्रोलरचा अमिताभ यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला होता. आता एका युजरने अभिषेक बच्चनला डिवचले आहे.या युजरने अभिषेकला डिवचत एक विचित्र प्रश्न केला. ‘बाप अस्पताल में भर्ती है, अब किसके भरोसे  बैठकर खाओगे?’ अशा शब्दांत या युजरने अभिषेकला ट्रोल केले. त्याच्या या प्रश्नाने अभिषेकचे अनेक चाहते संतापले. पण अभिषेकने मात्र त्याच्या या प्रश्नावर असे काही उत्तर दिले की, ट्रोल करणा-या या युजरची बोलती बंद झाली. 

काय दिले अभिषेकने उत्तर

‘बाप अस्पताल में भर्ती है, अब किसके भरोसे  बैठकर खाओगे?’ या ट्रोलरला अभिषेकने मजेशीर उत्तर दिले. ‘फिलहाल तो लेटकर खा रहें हैं दोनो एक साथ अस्पताल में,’ असे उत्तर अभिषेकने दिले. मात्र अभिषेकच्या या उत्तरावर युजरचे समाधान झाले नाही. ‘गेट वेल सून सर. हर किसी के किस्मत में लेट कर खाना कहां?’अशा शब्दांत युजरने अभिषेकला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र अभिषेकने यावरही अतिशय नम्र शब्दांत उत्तर दिले.

 ‘मी प्रार्थना करतो की, तुझ्यावर आमच्यासारख्या स्थिती ओढवू नये. सुरक्षित व स्वस्थ राहा. शुभेच्छांसाठी आभार,’ असे अभिषेकने लिहिले. यावर युजरची बोलती बंद झाली नसेल तर नवल.

ठोक दो... ; अमिताभ संतापले होते

अलीकडे एका युजरने अमिताभ यांच्यासाठी नको ते लिहिले होते. ‘माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही कोरोनामुळे मरावे,’ असे या व्यक्तिने लिहिले होते. खुद्द अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगममध्ये याची माहिती देत आपला संताप व्यक्त करत या व्यक्तिला अमिताभ यांनी चांगलेच सुनावले होते. ‘मिस्टर अज्ञात, तू तर तुझ्या वडिलांचे नावही लिहिलेले नाहीस. कदाचित तुझे वडिल कोण हे तुला ठाऊक नसावे. परमेश्वराच्या कृपेने मी जगलोच तर तुला लोकांचा प्रचंड राग सहन करावा लागेल. केवळ माझाच नाही माझ्या 9 कोटी फॉलोअर्स तुझ्यावर तुटून पडतील. तुला माहित असेलच की, माझे चाहते जगभरात आहेत. प्रत्येक कोपºयात. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि ही केवळ पेजची ईएफ नाही अर्थात एक्सटेंडेड फॅमिली नाही तर एक्सटर्मिनेशन फॅमिली आहे. ठोक दो साले को, मला फक्त त्यांना एवढे सांगायची देर आहे...’ अशा शब्दांत त्यांनी या युजरला फटकारले होते.

 

टॅग्स :अभिषेक बच्चन