Join us
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॉपची भीती की गुड लक? अभिषेक बच्चनने नावात जोडला एक्स्ट्रा ‘A’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 08:00 IST

होय, करिअरमध्ये पहिल्यांदा अभिषेक बच्चनने आपल्या नावात बदल केल्याचे पाहायला मिळतेय.

ठळक मुद्देअभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ हा सिनेमा येत्या 8 एप्रिलला प्रदर्शित होतोय. ‘द बिग बुल’ हा सिनेमा कूकी गुलाटी यांनी दिग्दर्शित केला आहे.

अभिषेक बच्चन म्हणायला महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा. महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन पित्याच्या पावलावर पाऊल टाकत सिनेसृष्टीत आला. पण इतक्या वर्षांत पित्यासारखे यश मात्र त्याला मिळवता आले नाही. यशाची चव चाखण्याआधीच ‘फ्लॉप अ‍ॅक्टर’चा शिक्का त्याच्या माथी बसला. हा शिक्का अभिषेकला अद्यापही पुसता आलेला नाही. खरे तर अभिषेकने अनेक हिट सिनेमेही दिलेत. पण लोकांनी त्याकडे दुर्लक्ष करत, त्याचे फ्लॉप सिनेमेच लक्षात ठेवले. मात्र आता अभिषेकला कुठल्याही स्थितीत ‘सक्सेस’ हवा आहे आणि यासाठी काय तर त्याने आपल्या नावात बदल केला आहे.

होय, करिअरमध्ये पहिल्यांदा अभिषेक बच्चनने आपल्या नावात बदल केल्याचे पाहायला मिळतेय. आजच अभिषेकच्या ‘द बिग बुल’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. हा ट्रेलर जरा लक्षपूर्वक बघितल्यास त्यात अभिषेकच्या नावातील बदल लक्षात येईल. अभिषेकने आता आपल्या नावात एक एक्स्ट्रा ‘A’ जोडला आहे. आता तो सिनेमात अभिषेक बच्चनऐवजी Abhishek A Bachchan लिहू लागला आहे. वाटायला हा साधा बदल आहे. पण Numerologyत याचे मोठे महत्त्व आहे.

या एका  एक्स्ट्रा ‘ए’ने अभिषेकच्या करिअरला मोठा लाभ होऊ शकतो. याआधी ‘लुडो’ या सिनेमाच्या रिलीजआधीही अभिषेकने Abhishek A Bachchan असेच नाव लिहिले होते. त्याच्या या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता ‘द बिग बुल’ला किती यश मिळते ते बघूच.

अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ हा सिनेमा येत्या 8 एप्रिलला प्रदर्शित होतोय. ‘द बिग बुल’ हा सिनेमा कूकी गुलाटी यांनी दिग्दर्शित केला आहे. अजय देवगण, आनंद पंडित, कुमार मंगत पाठक आणि विक्रांत शर्मा यांची निर्मिती असलेला हा सिनेमा डिज्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

टॅग्स :अभिषेक बच्चन