Join us

ऐश्वर्यासाठी अभिषेकने केले होते या अभिनेत्रीसोबत ब्रेकअप, मीडियापासून ही लपवून ठेवली होती ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 17:13 IST

अभिषेक तिच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की, दोन महिने सतत तिला फोन करून भेटण्याची विनंती करत होता.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाला जवळपास 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. बॉलिवूडच्या मोस्ट हॅपनिंग कपल पैकी हे दोघे एक आहेत. ऐश्वर्याच्या आधी अभिषेकच्या आयुष्यात करिश्मा कपूर होती. दोघे एकमेकांना लहानपणापासून ओळखतं होते. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. मात्र काही दिवसांनी दोघांनी आपलं रस्ते वगळे केले. करिश्मा कपूरशी साखरपुडा तुटल्यानंतर अभिषेकच्या आयुष्यात दीपनिता शर्मा या मॉडेल- अभिनेत्रीची एंट्री झाली होती. असंभव, कोई आप सा सारख्या सिनेमात दीपनिताने काम केले आहे. दोघांनी ओळख सोनाली बेंद्रेने करुन दिली होती. 

आजतकच्या रिपोर्टनुसार दीपनिता आणि अभिषेक एकमेकांना 10 महिने डेट करत होते. अभिषेक दीपनिताच्या प्रेमात वेडा झाला होता. अभिषेकने दीपनितासोबतचे रिलेशनशीप मीडियापासून नेहमीच लांब ठेवले. दीपनिता अभिषेकच्या बर्थ डे पार्टी ठेवत होती मात्र अभिषेकने त्या पार्टीत येण्यास नकार दिला. कारण त्याचवेळी अभिषेक ऐश्वर्या रायकडे आकर्षित होत होता. त्यानंतर अभिषेकने दीपनिताला इग्नोर करायला सुरुवात केली आणि दोघांचे ब्रेकअप झालं.  

गुरुच्या सेटवर ऐश्वर्या आणि अभिषेकची लव्हस्टोरी सुरु झाली. गुरू सिनेमाच्या प्रीमियरनंतर टोरंटोमध्ये अभिषेकने लग्नासाठी ऐश्वर्याला प्रपोज केले होते. ऐश्वर्याने ही अभिषेकने केलेले प्रपोजल लगेच स्वीकारले आणि  2007 मध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.   

 

टॅग्स :अभिषेक बच्चनऐश्वर्या राय बच्चन