गायक अरिजीत सिंहने पार्श्वगायनातून निवृत्तीचा निर्णय घेतला आणि बीटाऊनमध्ये एकच चर्चा रंगली. काहींनी अरिजीतला पाठिंबा दिला तर काहींनी त्याला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. अरिजीतच्या या निर्णयामुळे चाहते तर चांगलेच निराश झाले. अरिजीतच्या निवृत्तीची चर्चा असतानाच आता मराठी गायक, इंडियन आयडॉलचा विजेता अभिजीत सावंतने एक मोठा खुलासा केला. गायकांना फुकट काम करण्यासाठी लाचार केलं जातं असं तो म्हणाला.
अभिजीत सावंतने नुकतीच 'पेंटाराइज स्टुडिओज'ला मुलाखत दिली. यावेळी त्याला गायकांना किती मानधन मिळतं यावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, "गायक एखाद्या सिनेमातूनही लोकप्रिय व्हावा असं काही लोकांना वाटत नाही. गायकांना ठराविक रक्कमच दिली जाते. जेणेकरुन तो गायक सिनेमापेक्षा मोठा होऊ नये. संगीत हा सिनेमाचा फक्त भाग आहे असंच त्याकडे बघितलं जातं. सिनेमा हिट होतो, गाणी लोकप्रिय होतात. पण आम्हाला रॉयल्टी मिळत नाही. संगीतकारांना आजही सिनेमातील संगीतासाठी रॉयल्टी मिळत नाही.
तो पुढे म्हणाला, "उदाहरण द्यायचं तर संगीतकार बिड्डू ज्यांनी माझ्या 'लफ्जो मे' या म्युझिक व्हिडीओसाठी संगीत दिलं होतं त्यांनी परदेशात दोन गाणी केली. त्या गाण्यातून त्यांनी इतकी रॉयल्टी मिळाली की त्या पैशांमधून ते पूर्ण आयुष्य काढू शकतात. त्या गाण्यातून एकेकाळी तर तो चांगला पैसा कमावत होता. तेच आम्हाला इथे एका गाण्यातून इतके पैसे मिळतील याचा आम्ही विचारही करु शकत नाही. कारण ही सिस्टीमच अशी आहे. दुसरं म्हणजे गायकही लोभी आहेत. पैसे भलेही कमी मिळतील पण हे गाणं माझ्या आवाजात असावं असा विचार करुन ते ऑफर स्वीकारतात. हे काही छोट्या गायकांचं नाही तर सगळेच अगदी मोठमोठे गायकही हेच करतात. या संगीतकाराकडे, या कलाकारासाठी, या सिनेमासाठी मी गाणं करेन तर आपलं करिअर बनेल असं त्यांना वाटतं. त्यामुळे आम्ही स्वत: गायकांचीही यात चूक आहे."
Web Summary : Following Arijit Singh's retirement buzz, Abhijeet Sawant exposed how singers are often compelled to work without proper compensation, driven by career aspirations and industry norms.
Web Summary : अरिजीत सिंह की सेवानिवृत्ति के बाद, अभिजीत सावंत ने खुलासा किया कि कैसे गायक अक्सर करियर की आकांक्षाओं और उद्योग मानदंडों के कारण बिना उचित मुआवजे के काम करने के लिए मजबूर होते हैं।