अभय ‘हॅप्पी...’ च्या सिक्वेलमध्ये काम करण्यास उत्सुक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 12:32 IST
अभय देओल, डायना पेंटी यांच्या मुख्य भूमिकेतील ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपटाला चाहत्यांबरोबरच समीक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या भागाला ...
अभय ‘हॅप्पी...’ च्या सिक्वेलमध्ये काम करण्यास उत्सुक!
अभय देओल, डायना पेंटी यांच्या मुख्य भूमिकेतील ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपटाला चाहत्यांबरोबरच समीक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या भागाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आता सिक्वेल काढण्याचाही विचार सुरू आहे.अभय देओल आगामी सिक्वेलमध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचे तो सांगतो. याशिवाय पहिल्या भागात जिमी शेरगील, अली फजल आणि मोमल शेख हे मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट १८ आॅगस्टला रिलीज झाला होता.त्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे अभयला खुप आनंद झाला होता. त्यामुळे त्याने असा निर्णय घेतला आहे. तो म्हणाला,‘ जर गरज पडली तर मला चित्रपटनिर्मिती करावी लागली तरी मी करेन.’