Join us
Daily Top 2Weekly Top 5

अबब... नणंदच्या बायोग्राफी लॉन्च कार्यक्रमात करिना कपूरने एवढ्या किमतीचा परिधान केला ड्रेस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 19:58 IST

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करिना कपूर-खान हिची नणंद सोहा अली खान हिच्या आॅटोबायोग्राफी लान्चचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात ...

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करिना कपूर-खान हिची नणंद सोहा अली खान हिच्या आॅटोबायोग्राफी लान्चचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात करिना खूपच बोल्ड अंदाजात उपस्थित होती. तिने परिधान केलेल्या रेड शॉर्ट ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत होती. करिनाचा हा अंदाज बघून तिचे चाहते सुखावले नसतील तरच नवल. मात्र तिने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत तुम्हाला माहिती आहे काय? होय, तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. कारण हा ड्रेस खूपच महागडा असून, त्याची किंमत ५.४ लाख रुपये इतकी आहे. हा ड्रेस परिधान करून करिना पती सैफ अली खानसोबत या कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी तिचा हा ग्लॅमर अंदाज सगळ्यांनाच भावला होता. फॅशन डिझायनर बिभू मोहपट्राने हा ड्रेस डिझाइन केला. या नेकलाइन ड्रेसमध्ये फुल स्लीव्ज होती. यावर लाल रंगाची एम्ब्रॉयडरी केली होती. या ड्रेसचे मटेरियल शिफॉनचे होते. यावेळी करिनाने या ड्रेसवर ब्लॅक कलरची हील घातली होती. तसेच सिम्पल मेकअपमध्ये तिचे सौंदर्य खूपच उठून दिसत होते. यावेळी करिनाने या ड्रेसवर कुठल्याही प्रकारची ज्वेलरी कॅरी केली नव्हती. करिनाला हा स्टायलिश लूक तान्या घरर्वीने दिला होता. डिझायनर बिभूने इन्स्टाग्रामवर करिनाचे या इव्हेंटमधील काही फोटोज् शेअर केले आहेत. असो, करिनाचा हा ग्लॅमर अंदाज बघून तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा पहिल्यासारखीच करिना बघावयास मिळाली असेल यात शंका नाही. कारण तैमूरच्या जन्मानंतर करिनाचे वजन खूप वाढले होते. हा स्लीम लूक धारण करण्यासाठी तिला बरीचशी मेहनत घ्यावी लागली. सध्या करिना तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिचा हा चित्रपट २०१८ मध्ये रिलीज होणार आहे.