Join us  

ABCD3 ​: जॅकलिन फर्नांडिस व सलमान खान बनणार १३ वर्षांच्या मुलीचे मम्मी-पापा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2017 5:03 AM

बॉलिवूडची एक चर्चित आॅनस्क्रीन जोडी लवकरच एका चित्रपटात पुन्हा एकत्र झळकणार आहे.  ही जोडी आहे, सलमान खान आणि जॅकलिन ...

बॉलिवूडची एक चर्चित आॅनस्क्रीन जोडी लवकरच एका चित्रपटात पुन्हा एकत्र झळकणार आहे.  ही जोडी आहे, सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस यांची. सन २०१४ मध्ये आलेल्या ‘किक’ या चित्रपटानंतर सलमान व जॅकलिन पुन्हा एकदा आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. होय, रेमो डिसूजाच्या आगामी चित्रपटात जॅक व सलमान असल्याचे कळतेय. रेमो आपल्या ‘एबीसीडी’ सीरिजचा तिसरा चित्रपट लवकरच घेऊन येतो आहे. या चित्रपटात सलमान व जॅक पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘टायगर जिंदा है’नंतर सलमान या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहे. या चित्रपटाची हिरोईन फायनल झाली आहे. रेमोने यासाठी जॅकलिनला पसंती दिली आहे. रेमोने जॅकलिनला या चित्रपटाची आॅफर दिली आणि जॅकलिनला ती प्रचंड भावली. सध्या ती भारताबाहेर आहे. तेथून परतल्यावर रेमो तिला संपूर्ण चित्रपटाचे नॅरेशन देणार आहे. यानंतर तिला या चित्रपटासाठी साईन केले जाणार आहे.या चित्रपटात सलमान व जॅकलिन एका १३ वर्षांच्या मुलीच्या आई-वडिलांची भूमिका साकारणार आहेत. वडील आणि मुलीच्या नात्यावर विणलेली ही एक भावनिक कथा आहे. निश्चितपणे यात खूप सारा डान्सही आहे. डान्स म्हटल्यानंतर सलमानला यासाठी प्रचंड रिहर्सल्स करणेही आलेच. शूटींग सुरु करण्यापूर्वी सलमान ही रिहर्सल्स सुरु करेल, असे समजतेय.ALSO READ : सलमान खानला आठवला तुरुंगातील तो भावूक क्षण!सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान व त्याची मुलगी एका डान्स कॉम्पिटेशनमध्ये भाग घेतात. जॅकलिन या दोघांची डान्स टिचर असते. ती त्या दोघांना डान्सचे अनेक प्रकार शिकवते. जॅकलिन एक चांगली अभिनेत्री आहेच. शिवाय ती एक चांगली डान्सरही आहे. त्यामुळे रेमोने या चित्रपटासाठी योग्य निवड केली असेच म्हणावे लागेल.