Join us

पुन्हा होणार आयुष्यमान खुराणाचे 'शुभ मंगल सावधान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 15:29 IST

आयुष्यमान खुराणा आणि भूमि पेडणेकर यांच्या शुभ मंगल सावधान सिनेमाच्या यशानंतर मेकर्स पुन्हा एकदा या सिनेमाचा रिमेक बनवण्याचा तयारीत आहे.

ठळक मुद्देशुभ मंगल सावधानच्या रिमेकमधून समलैंगिकतेवर भाष्य करण्यात येणार आहेपुढच्या वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

आयुष्यमान खुराणा आणि भूमि पेडणेकर यांच्या शुभ मंगल सावधान सिनेमाच्या यशानंतर मेकर्स पुन्हा एकदा या सिनेमाचा रिमेक बनवण्याचा तयारीत आहे.  शुभ मंगल सावधानच्या रिमेकमधून समलैंगिकतेवर भाष्य करण्यात येणार आहे. सध्या या सिनेमाचे कास्टिंग सुरु आहे. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शुभ मंगल ज्यादा सावधान चे निर्मिती हितेश केवल्या करणार आहेत.  

याशिवायदेखील आयुष्यमान आणि भूमी दिग्दर्शक अमर कौशिकचा आगामी चित्रपट 'बाला'मध्ये दिसणार आहेत.  हे दोघे खूप चांगले मित्र असून ते या चित्रपटाच्या प्रवासा सुरूवात करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 

याबाबत आयुषमान म्हणाला की, 'आमच्या दोघांचे विचार एकमेकांशी खूप जुळतात. त्यामुळे आमचे चांगले जमते. मला आनंद आहे की भूमी व माझ्या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. आता सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर पुढील प्रोजेक्टची जबाबदारी आणखीन वाढते. मला आशा आहे की या चित्रपटाची स्क्रीप्ट जगभरातील लोकांना आवडेल. भूमी टॅॅलेंटेड अभिनेत्री असून तिच्यासोबत काम करायला मजा येते. आम्ही आधीच लोकांना पाहण्यासाठी नवीन व अनोख्या गोष्टी दिल्या आहेत. आपल्या कथानकामुळे बाला चित्रपट देखील रसिकांना आवडेल आणि प्रेक्षक आमच्या तिसऱ्या सिनेमाला देखील खूप प्रेम देतील अशी आशा आहे.' 

टॅग्स :आयुषमान खुराणाभूमी पेडणेकर