''हाथों मे पूजा की थाली आई रात सुहागो वाली'' म्हणत सा-याच सौभाग्यवती करवाचौथच्या रंगात न्हाऊन निघात आहेत. याच निमित्ताने एक नजर टाकूया फिल्मी करावाचौथवर.
सौभाग्यवतीसाठी करवाचौथ एक खास दिवस असतो ज्यावळी ते त्यांच्या पतीदेवसाठी दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करत व्रतही करतात. रात्री चंद्राचे दर्शन घेतल्यानंतरच व्रत सोडण्याची प्रथा आहे. करवाचौथची हीच परंपरा सगळ्यात आधी रूपेरी पडद्यावर रंगवली ती यश चोप्रा यांनी. यश चोप्रा यांच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमात करवा चौथची परंपरा पाहायला मिळाली आणि तेव्हापासूनच ख-या अर्थाने सिनेमात करवाचौथ ही परंपरा दाखवण्याचा ट्रेंड सुरू झाला.
यशचोप्रांच्या सिनेमांप्रमाणेच करवाचौथचा ट्रेंड पुढे करण जोहरनेही फॅालो केला. 'कभी खुशी कभी गम' या सिनेमातही ''अपनी माँग सुहागण हो, संग हमेशा साजन हो'' म्हणत कजोल आणि शाहरूखने, जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी करवाचौथचे रूपेरी पडद्यावर दणक्यात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.
तसेच कजोल व्यतिरिक्त 'येस बॅास' सिनेमात शाहरूख खानसाठी जुही चावलानेही करवाचौथ केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर सिल्वर स्क्रीनवर करवाचौथची पूजा करत आणखी एक जोडीने सगळ्यांना भुरळ घातली. ती जोडी म्हणजेच सलमान खान आणि ऐश्वर्या रॅाय बच्चन. ''आया रे... आया चँदा अब सारी ख्वाईश पुरी होगी'' म्हणजत ऐश्वर्या सलमानने आपल्या अंदाजात करवाचौथही प्रथा रूपेरी पडद्यावर दाखवली होती. रिअल लाईफमध्ये मोस्ट वाँटेड असणार-या सलमान खानसाठी या सिनेमापूर्वीही करिश्मा कपूर आणि सुष्मितासेनही करवाचौथचे व्रत करताना रूपेरी पड्यावर दिसले होते.
यानंतर यंग जनरेशचे चार्मिंग जोडी अमृता राव आणि शाहिद कपूरही 'इश्क-विश्क' सिनेमात करवाचौथच्या रंगात न्हावून निघाले.
या सगळ्या जोडींमध्ये खास जोडी अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांनी तर करवाचौथचा खरा अर्थ रूपेरी पडद्यावर समजवला तो 'बागबान' या सिनेमातून. या सिनेमात दोघांमध्ये करवाचौथच्याच दिवशी दुरावा येऊनही त्यांच्या प्रेमाची ताकत त्यांनी रूपेरी पडद्यावर खुबीने रंगवली. तर हा होता रूपेरी पडद्यावरचा फिल्मी करवाचौथ जो आजही सा-या सौभाग्यवतींच्या मनात घर करून आहेत.