आशिकी २ ची जोडी.....आदित्य-श्रद्धा पुन्हा प्रेक्षकांना दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 10:59 IST
आदित्य राय कपूर आणि श्रद्धा कपूरने ‘आशिकी २’ मध्ये सोबत काम केले होते, ज्याने बॉक्स आॅफिसवर दर्जेदार यश संपादन ...
आशिकी २ ची जोडी.....आदित्य-श्रद्धा पुन्हा प्रेक्षकांना दिसणार
आदित्य राय कपूर आणि श्रद्धा कपूरने ‘आशिकी २’ मध्ये सोबत काम केले होते, ज्याने बॉक्स आॅफिसवर दर्जेदार यश संपादन करून व्यावसायिक तज्ज्ञांना चकित केले. या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी आदित्य-श्रद्धा मध्ये रोमांसला सुरु वात झाली होती, मात्र नंतर दोघांचे रस्ते वेगवेगळे झाले.बातचीत अशी आहे की, या जोडीच्या केमिस्ट्रीला प्रभावित होऊन निर्देशक शाद अलीने आपल्या पुढील चित्रपटात दोघांना घेतले आहे. चित्रपटाचे नाव आहे ‘ओके जानू’. हा दक्षिण भारतीय चित्रपट ‘ओ कधल कनमनी’ चा रिमेक असेल.चित्रपटाची मार्च मध्ये शूटिंग सुरू होईल. करण जौहर निर्माता असतील आणि चित्रपटाची शूटिंग जास्तीत जास्त देशाची राजधानी दिल्लीत होणार आहे.