फॅशनमध्ये आई ऐश्वर्यापेक्षा कुठेही कमी नाही आराध्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2017 14:21 IST
ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या राय बच्चन या मायलेकीची जोडी म्हणजे बॉलिवूडची सर्वाधिक हिट मायलेकीची जोडी. या दोघी जेव्हा ...
फॅशनमध्ये आई ऐश्वर्यापेक्षा कुठेही कमी नाही आराध्या!
ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या राय बच्चन या मायलेकीची जोडी म्हणजे बॉलिवूडची सर्वाधिक हिट मायलेकीची जोडी. या दोघी जेव्हा केव्हाही बाहेर पडतात, सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंचा पूर येतो. काल रात्रीही या दोघी मायलेकी बाहेर पडल्यात. मुंबई विमानतळावर दोघीही दिसल्या. ऐश्वया व आराध्या दोघीही न्यूयॉर्कला सुट्टी घालवण्यासाठी रवाना झाल्याचे कळतेय. अभिषेक आधीच न्यूयॉर्कला आहे. न्यूयॉर्कमधून तिघेही लंडनला पोहोचतील आणि तिथे सुट्टी एन्जॉय करतील, असा बेत आहे. अर्थात या तिघांच्या सुट्टीपेक्षा आमच्याकडे आणखी एक मोठी बातमी आहे. होय, ती म्हणजे आराध्याच्या फॅशनची. होय, आत्तापासून फॅशनच्या बाबतीत आराध्या आई ऐश्वर्यापेक्षा काकणभर अधिक असल्याचे दिसतेय. आत्तापासून ती आईला टक्कर देऊ पाहतेय. विश्वास बसत नसेल तर सोबतचा फोटो तुम्ही बघायलाच हवा. यात आराध्यात अगदी आईसारखे स्टाईलिश शूज घालून दिसतेय. पांढरा टॉप आणि निळी जीन्स सोबत स्टाईलिश शूट अशा अवतारात आराध्याने सगळ्या कॅमेºयांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले. आराध्याचा स्टाईलिश लूक तुम्हाला कसा वाटला, हे कळवायला आम्हाला विसरू नका. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवू शकता. अभिषेक बच्चन लवकरच जे.पी. दत्ता यांच्या पलटन या सिनेमात दिसणार आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु होत आहे. त्यापूर्वी काही वेळ कुटुंबासोबत घालवण्याचा अभिषेकचा इरादा होता. अभिषेकशिवाय ऐश्वर्या सुद्धा लवकरच आपल्या नव्या चित्रपटांत बिझी होणार आहे. मनी रत्नम आणि राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्या चित्रपटांत ऐश्वर्या झळकणार आहे. त्यामुळे अशात फॅमिली हॉलिडेचा निर्णय एकदम योग्य आहे.