Join us
Daily Top 2Weekly Top 5

शालेय कार्यक्रमात हे स्टार किड झळकले राम-सीतेच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 16:36 IST

अमिताभ बच्चन यांची नात आराध्या आणि आमिर खानचा मुलगा आझाद हे दोघे मुंबईतील धीरूबाई अंबानी स्कूलमध्ये एकत्र शिकतात. त्यांनी नुकताच त्याच्या शाळेतील कल्चरल प्रोगॅमला एक कार्यक्रम सादर केला होता.

ठळक मुद्देआराध्या आणि आझाद त्यांच्या शाळेतील दसऱ्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.या कार्यक्रमात त्या दोघांना राम आणि सीतेच्या भूमिकेत पाहायला मिळाले. त्या दोघांनी एका नाटकात काम केले होते. या पौराणिक वेशात ते दोघेही खूपच छान दिसत होते. या कार्यक्रमासाठी तालमी करतानाचा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 

शालेय कार्यक्रमात आपल्या मुलांचे-मुलींचे परफॉर्मन्स पाहायला त्यांचे पालक आवर्जून जातात. धीरूबाई अंबानी स्कूलमध्ये तर अनेक सेलिब्रेटींची मुले शिकत आहेत. त्यामुळे हे सेलिब्रेटी वेळात वेळ काढून या कार्यक्रमांना हजेरी लावतात. असाच एक कार्यक्रमात नुकताच धीरूबाई अंबानी स्कूलमध्ये पार पडला. या कार्यक्रमात दोन स्टार किड्सनी परफॉर्मन्स सादर केला. 

अमिताभ बच्चन यांची नात आराध्या आणि आमिर खानचा मुलगा आझाद हे दोघे मुंबईतील धीरूबाई अंबानी स्कूलमध्ये एकत्र शिकतात. त्यांनी नुकताच त्याच्या शाळेतील कल्चरल प्रोगॅमला एक कार्यक्रम सादर केला होता. या कार्यक्रमाचे सध्या सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

आराध्या आणि आझाद त्यांच्या शाळेतील दसऱ्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्या दोघांना राम आणि सीतेच्या भूमिकेत पाहायला मिळाले. त्या दोघांनी एका नाटकात काम केले होते. या पौराणिक वेशात ते दोघेही खूपच छान दिसत होते. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्या फॅन्सतर्फे चालवण्यात येत असलेल्या ट्विटरच्या अकाऊंटवर आराध्या आणि आझाद दोघे पाहायला मिळत आहेत. त्याचसोबत या कार्यक्रमासाठी तालमी करतानाचा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 

 

आझाद आणि आराध्याने शाळेच्या कार्यक्रमात भाग घेण्याची ही काही पहिली वेळ नाही. त्यांनी गेल्या वर्षी देखील एक परफॉर्मन्स त्यांच्या शाळेच्या कार्यक्रमात सादर केला होता आणि विशेष म्हणजे त्यावेळी देखील दोघांनी एकत्रच परफॉर्मन्स दिला होता. रेल गाडी या प्रसिद्ध गाण्यावर ते दोघे आपल्या वर्गातील मुलांसोबत थिरकले होते. 

आराध्या आणि आझाद हे दोघेही स्टार किड असले तरी त्यांना मीडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच त्यांचे पालक करतात. आझाद क्वचितच आमिर आणि किरणसोबत मीडियासमोर येतो. तसेच ऐश्वर्या कोणत्या कार्यक्रमाला जात असेल तर अनेकवेळा आराध्या तिच्यासोबत असते. केवळ अशावेळीच तिला मीडियाच्या कॅमेऱ्यात टिपण्यात येते. 

टॅग्स :अमिताभ बच्चनअभिषेक बच्चनऐश्वर्या राय बच्चनआमिर खान