आमीरचा ‘वेट लॉस’ फंडा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 08:40 IST
आमीर खान सध्या ‘दंगल’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून त्याने ५१ व्या वाढदिवसाच्या दिवशी जवळपास १३ किलो वजन कमी केल्याचे ...
आमीरचा ‘वेट लॉस’ फंडा !
आमीर खान सध्या ‘दंगल’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून त्याने ५१ व्या वाढदिवसाच्या दिवशी जवळपास १३ किलो वजन कमी केल्याचे जाणवले. तो तीन आठवड्यांसाठी अमेरिकेला गेला आणि आल्यानंतर एकदम सडपातळ आणि बॉडीशेपमधील शरीर घेऊन तो भारतात परतला. जेव्हा त्याला विचारण्यात आले की, त्याने एवढे वजन कसे कमी केले? तेव्हा त्याने त्याचा संपूर्ण दिवसाचा शेड्यूल प्लॅनच सांगितला. जेव्हा तो अमेरिकेत जायला निघाला तेव्हा त्याचे वजन ९५ किलो होते, पण जेव्हा तो तिथून परतला तेव्हा त्याचे वजन ८२ किलो होते. त्याला अजून १० ते १२ किलो वजन कमी करावयाचे आहे. त्याचे यूएसमधील एरिझोना ट्रिपचे काही फोटो लीक झाले आहेत. महावीर सिंग फोगट ची दंगलमधील बॉडी बनवायला आमीरला जवळपास ३ महिन्यांचा कालावधी लागला. ३ महिन्यातील प्रत्येक दिवस तो वजन वाढवण्यासाठीच खर्च करत होता. आमीरचा दिवस ६ वाजता सुरू व्हायचा आणि त्याच्या चार्ट नुसार संपूर्ण दिवस खुप जास्त बिझी जायचा. सायकलिंग, वेट एक्झरसाईजेस, स्विमिंग, प्लेयिंग टेनिस हे सर्व तो दिवसभराच्या काळात करत असे. आमीरची वेट लॉस जर्नी ही खरंतर खुपच प्रेरणादायी अशी आहे.