Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आमिरला सतावतेय ‘दंगल’ची भीति

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 14:46 IST

आजकल चित्रपट सिनेमागृहात येण्या अगोदरच आॅनलाइन लीक होत आहेत. रितेश विवेक आणि आफताब स्टारर ‘ग्रेट ग्रॅँड मस्ती’ च्या अगोदर ...

आजकल चित्रपट सिनेमागृहात येण्या अगोदरच आॅनलाइन लीक होत आहेत. रितेश विवेक आणि आफताब स्टारर ‘ग्रेट ग्रॅँड मस्ती’ च्या अगोदर शाहिद कपूरचा उडता पंजाबची सेन्सार कॉपी आॅनलाइन लीक झाली होती. या अगोदरदेखील मांझी दी माउंटेन मॅन देखील हेच घडले होते. उड़ता पंजाबची कॉपी लीक झाली होती तेव्हा आमिर खानने सेन्सॉर बोर्डाला धारेवर धरले होते. एका पाठोपाठ एक आॅनलाइन लीक होणाºया चित्रपटांना पाहून आता आमिर खानला आपल्या ‘दंगल’ चित्रपटाबाबत भीति सतावत आहे. ‘दंगल’ ला लीक होण्यापासून वाचविण्यासाठी नुकतीच आमिरने आपल्या काही खास व्यक्तिंची सिक्रेट मीटिंगदेखील घेतली. विशेष म्हणजे आमिरने दंगलसाठी खूप मेहनत केली आहे.