Join us

आमिर म्हणतोय कथा मनाला भिडली तरच चित्रपट करतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2016 12:01 IST

आमिर खानला परफेक्शनिस्ट म्हणूनच ओळखले जाते. आमिरचे चित्रपट हे हिट होणारच हे सध्या समीकरणच बनले आहे. पण चित्रपटाची निवड ...

आमिर खानला परफेक्शनिस्ट म्हणूनच ओळखले जाते. आमिरचे चित्रपट हे हिट होणारच हे सध्या समीकरणच बनले आहे. पण चित्रपटाची निवड करताना आमिर खूप चोखंदळ असतो असे त्याचे म्हणणे आहे. एखादी कथा त्याच्या मनाला जोपर्यंत भिडत नाही, तोपर्यंत तो चित्रपट स्वीकारत नाही असे तो सांगतो. दंगल या चित्रपटासाठी आमिरला कित्येक किलो वजन वाढवायला लागणार होते. त्यामुळे हा चित्रपट करायचा की नाही अशा द्वीधा मनस्थितीत तो होता. पण काही केल्या या चित्रपटाची कथा त्याच्या डोक्यातून जातच नव्हती. त्यामुळे जवळजवळ आठ महिन्याने नितेश तिवारीला ही कथा पुन्हा एकदा ऐकवायला सांगितली आणि त्याचक्षणी हा चित्रपट करायचे असे ठरवले असे आमिर सांगतो.