Join us

आमिर खानचा बहुप्रतीक्षित 'लाल सिंह चड्ढा' 2021च्या ख्रिसमसमध्ये होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 16:04 IST

आमिर खान आणि ख्रिसमसचे नाते जुने आहे

कोरोनाच्या प्रतिकूल पार्श्वभूमीवर बरेचसे चित्रपट आपल्या प्रदर्शनाच्या तारखांमध्ये फेरबदल करत आहेत, कारण या काळात आरोग्य आणि लोकांची  सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे. आमिर खानची बहुप्रतीक्षित फिल्म 'लाल सिंह चड्ढा' आधी 2020 च्या नाताळमध्ये प्रदर्शित करण्याचे ठरले होते, आता हा चित्रपट  2021 च्या ख्रिसमसमध्ये  प्रदर्शित होणार आहे.

आमिर खान आणि ख्रिसमसचे नाते जुने आहे. ख्रिसमसदरम्यान प्रदर्शित झालेले त्याचे सर्व चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले आहेत, ज्यात 3 इडियट्स, पीके, धूम 3, दंगल  चित्रपटांचा समावेश आहे. त्याचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' टॉम हंक्सच्या ‘फॉरेस्ट गम्प’वर आधारित आहे. . आतापर्यंत सिनेमाचे शूटिंग कोलकाता, दिल्ली, राजस्थान, चंदीगड आणि अमृतसर यासारख्या ठिकाणी झाले आहे..सध्या आमिर खान आपल्या चित्रपटाच्या रेकीसाठी तुर्कीमध्ये आहे. 

'लाल सिंह चड्ढामध्ये आमिर खान आणि करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहेत. यासोबतच मोना सिंह एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अतुल कुलकर्णी द्वारे लिखित आणि अद्वैत चंदन द्वारे दिग्दर्शित करण्यात आला असून प्रीतम यांचे संगीत आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी गीत लेखन केले आहे.

टॅग्स :आमिर खान