आमीर खानचा खुलासा, शाहरूखसोबत काम करणार नाही, ती भेट म्हणजे ‘दोस्ताना मुलाखत’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 21:13 IST
गेल्या महिनाभरात एकदा नव्हे तर दोनदा एकत्र आलेले अभिनेता शाहरूख खान आणि आमीर खान लवकरच एकत्र सिनेमा करणार असल्याची ...
आमीर खानचा खुलासा, शाहरूखसोबत काम करणार नाही, ती भेट म्हणजे ‘दोस्ताना मुलाखत’
गेल्या महिनाभरात एकदा नव्हे तर दोनदा एकत्र आलेले अभिनेता शाहरूख खान आणि आमीर खान लवकरच एकत्र सिनेमा करणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु या दोघांच्या चाहत्यांना यांना पडद्यावर एकत्र बघण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने दोघांच्या या भेटीचा खुलासा करताना म्हटले की, मी आणि शाहरूख सध्या तरी कुठल्याही सिनेमासाठी काम करीत नसून, आमच्यातील ही भेट म्हणजे ‘दोस्ताना मुलाखत’ होती. बॉलिवूडमधील सुपरस्टार अशी ओळख असलेले या दोघा दिग्गजांनी आतापर्यंत एकदाही स्क्रीन शेअर केलेली नाही; मात्र जेव्हा गेल्या महिन्यात शाहरूखने आमीर आणि बिझिनेसमॅन अजय बिजली यांच्यासोबतचा एक सेल्फी शेअर केला होता, त्यावरून प्रत्येकाकडून हे दोघे एकत्र येणार असल्याच्या अंदाजाचे इमले बांधणे सुरू होते. त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वीच स्टार प्लसच्या ‘नई सोच’ या अभियानाच्या जाहिरातीत आमीर जोडला गेल्यानंतर शाहरूखही सहभागी होणार असल्याने या दोघांमधील कटूता संपल्याचेही स्पष्टपणे दिसत होते. परंतु आमीरने या चर्चांना पूर्णविराम दिला असून, आम्ही सध्यातरी एकत्र काम करीत नसल्याचे म्हटले आहे. वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रम स्थळी आलेल्या आमीरला शाहरूखसोबत काम करण्याविषयी विचारले असता त्याने म्हटले की, ‘नाही, मी त्याला (शाहरूख खान) गेल्या काही महिन्यात दुसºयांदा भेटलो आहे. बºयाच काळानंतर आम्ही अजय बिजलीच्या पार्टीत एकत्र आलो होतो. त्याच्यासोबतची ही भेट मला चांगली वाटली. त्यानंतर पुन्हा आमची भेट झाली; मात्र या भेटी निव्वळ ‘दोस्ताना मुलाखती’ होत्या. कारण यादरम्यान आम्ही कामाविषयी काहीही बोललो नाही. यावेळी आमीरला पहिला भारतीय अवकाश यात्री राकेश शर्मा याच्या जीवनावर बनत असलेल्या सिनेमाविषयीही विचारण्यात आले. तेव्हा त्याने म्हटले की, सध्या मी केवळ ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’कडे लक्ष केंद्रित केले नाही. त्याव्यतिरिक्त मी अद्याप तरी कुठलाही सिनेमा साइन केलेला नाही. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये आमीर पहिल्यांदा महानायक अमिताभ बच्चन याच्याबरोबर काम करणार आहे. बिग बीसोबत काम करताना उत्साहित असल्याचेही आमीरने सांगितले.