Join us

'तुझ्यासोबत राहणं आणि तुला वचन देणं'..आमिरची लेक इराने नुपूरसोबतच रिलेशनशिप केलं कन्फर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 11:49 IST

इरा आणि नूपूर हे गेल्या सहा महिन्यांपासून डेट करतायेत.

आमिर खानची मुलगी इरा खान आणि तिचा फिटनेस कोच नुपूर शिखर बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करतेय.  व्हॅलेंटाईन वीकमध्ये इराने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत रिलेशनशीप जवळजवळ कन्फर्म केलं आहे. 

इराने प्रॉमिस डेला नुपूरसोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. यात 'माय व्हॅलेंटाईन' चा हॅशटॅगही देण्यात आला आहे. इराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुझ्यासोबत राहणं आणि तुला वचन देणं अभिमानाची गोष्ट आहे.  नुपूर शिखरने  इराला 'आय लव यू' म्हणत या पोस्टला उत्तर दिले आहे.

इरा खान अलीकडेच चुलत बहीण झेनच्या लग्नानाला गेली होती. यावेळी कुटुंबासोबत नूपुरदेखील तिच्यासोबत होतो. इराने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले होते. रिपोर्ट्सनुसार, इरा आणि नूपूर हे गेल्या सहा महिन्यांपासून डेट करतायेत. लॉकडाऊन दरम्यान दोघे जवळ आल्याच्या बातम्या आल्या आहेत. नुपूर शिखर हा सेलिब्रेटी फिटनेस कोच आहे. सध्या तो आमिर खान, इरा खान आणि सुष्मिता सेन यांना ट्रेनिंग देतोय. इरा खानने अद्याप चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले नाही, ती थिएटर आणि दिग्दर्शनात तिची आवड जोपासत आहे. आमिर खानची मुलगी म्हणून इरा खान सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. तिचे लाखोंमध्ये फॉलोअर्सही आहेत. 

टॅग्स :इरा खानआमिर खान