Join us

आमिर खान नाही बजावणार मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 15:25 IST

आज महानगरपालिकेसाठीच मतदान होतंय. आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक जण मतदान केंद्रावर जाऊन मतदान करताना दिसतोय. बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी ...

आज महानगरपालिकेसाठीच मतदान होतंय. आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक जण मतदान केंद्रावर जाऊन मतदान करताना दिसतोय. बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी ही आपला हक्क बजावला  एव्हरग्रीन रेखा. जोया अख्तर, अनुष्का शर्मा, गीतकार गुलजार साहेब यांनी मतदान केंद्रावर जाऊन वोट केले. मात्र या सगळ्यात काही अशी ही मंडळी आहेत जी आज शहरातून बाहेर असल्यामुळे मतदान करणार नाही आहेत. या सगळ्यात मोठे नाव आहे ते बॉलिवूडमधला मी.परफेक्शनिस्ट आमिर खानचे हो तुम्ही अगदी बरोबर वाचलात. आमिर खान आज वोट करणार ऩसल्याची माहितीसमोर येतेयं.. नेहमीच सामाजिक विषयांवर भरभरुन बोलणारा आमिर मतदानाच्या दिवशी शहारतून बाहेर आहे त्यामुळे तो मतदान करणार नसल्याचे समजतेय. सत्यमेव जयतेच्या माध्यमातून अनेक सामाजिक विषयांवर आमिर खानेन भाष्य केले होते. मात्र तोच आमिर आज जेव्हा आपले कर्तव्य पार पाडण्याची वेळ आली तेव्हा शहरा बाहेर गेला. आमिरने मुंबईकरांना वृत्तपत्रांमधून वोट करो महाराष्ट्रकरचे आवाहन ही केला. आमिर खानने आज पर्यंत त्याच्या प्रत्येक चित्रपटातून देशवासियांना काहीना काही संदेश दिला आहे. मात्र हे सगळ फक्त लोकांना सांगण्यापुरत मर्यादित असते का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आमिर प्रमाणेच ऋतिक रोशन, अजय देवगण, संजय दत्त, सैफ अली खान. कंगना रणौत आणि अर्जुन कपूर ही शहराच्या बाहेर आहेत त्यामुळे तेही आपला मतदानाचा हक्क बजावणार नाही आहेत. आज 10 महानगरपालिका,11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी मतदान सुरु आहे.