Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाढलेले केस, हातात मशाल अन्...; आमिरचा लूक पाहून नेटकरी चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 19:19 IST

आता आमिर खानच्या आगामी प्रोजेक्टमधील लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान चर्चेत आला आहे. 'लाल सिंह चड्ढा' सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर आमिरने कामातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी 'सितारे जमीन पर' या सिनेमाबाबत चर्चा रंगू लागली होती. अशातच 'तारे जमीन पर' फेम दर्शील सफारीने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन आमिरबरोबरचा फोटो शेअर केला होता. त्यामुळे ते दोघं पुन्हा एकत्र काम करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता आमिर खानच्या आगामी प्रोजेक्टमधील लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

आमिर खानबरोबर तब्बल १६ वर्षांनी काम करत असल्याचं सांगितल्यानंतर दर्शीलने पुन्हा त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.  यामध्ये आमिरच्या आगामी प्रोजेक्टमधील काही लूक शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये एका लूकमध्ये तो अंतराळवीर दिसत आहे. तर दुसऱ्यामध्ये हातात मशाल घेऊन दिसत आहे. आमिरचे केसही वाढलेले दिसत आहेत. त्याचा हा लूक पाहून नेटकरी चक्रावले आहेत. 

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने 'सितारे जमीन पर' सिनेमाची घोषणा केली होती. आता या सिनेमातील हा लूक आहे का? हे मात्र अद्याप कळलेलं नाही. पण, दर्शील आणि आमिरचे एकत्र फोटो बघून ते जाहिरातीसाठी एकत्र आल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला होता. 

टॅग्स :आमिर खानसेलिब्रिटी