Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आमिर खानला पडद्यावर साकारायचा होता ‘कृष्ण’, पण अधूरे राहणार स्वप्न!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 14:10 IST

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान ‘महाभारत’ या बिग बजेट चित्रपटाची घोषणा कधी करतो, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. या प्रोजेक्टमध्ये ...

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान ‘महाभारत’ या बिग बजेट चित्रपटाची घोषणा कधी करतो, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. या प्रोजेक्टमध्ये मुकेश अंबानी १ हजार कोटींची गुंतवणूक करणार, आमिर  कृष्णाची तर दीपिका पादुकोण द्रौपदीची भूमिका साकारणार, अशा काय काय बातम्याही कानावर येत होत्या. पण आता आमिरने हा पाच भागांतील ‘महा’प्रोजेक्ट बनवण्याचा इरादा रद्द केला आहे. अर्थात पूर्णत: नाही़ त्याऐवजी नव्या चेह-यांना सोबत घेऊन वेबसीरिज रूपात हा पीरियड ड्रामा साकारण्याचा त्याचा इरादा आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘महाभारत’ बनवण्याच्या मार्गात आमिरला दोन मोठ्या अडचणी जाणवत आहेत. एक म्हणजे, प्रस्थापित कलाकारांच्या एकत्र तारखा मिळणे अतिशय कठीण आहे. त्यामुळे चित्रपट ओव्हरबजेट होण्याचीही शक्यता असते. दुसरी अडचण म्हणजे, प्रस्थापित कलाकारांना धार्मिक व्यक्तिरेखेत प्रेक्षक स्वीकारतील की नाही, ही भीती त्याला आहे. सामान्यत: प्रस्थापित कलाकारांना अशा धार्मिक भूमिकांमध्ये प्रेक्षक स्वीकारत नाही. त्यामुळे विरोध, वाद याचा धोका संभवतो. आमिरला कुठलाही वाद नको आहे. त्यामुळे आमिरने मध्यममार्ग काढण्याचा निर्णय घेतला आहे.ALSO READ : ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’साठी आमिर खानने तयार केली खास ‘प्रमोशनल स्ट्रॅटेजी’सूत्रांचे खरे मानाल तर चित्रपटाऐवजी आता ‘महाभारत’वर वेबसीरिज बनवण्याचा निर्णय आमिरने घेतला आहे. यासाठी लवकरच नव्या चेहºयांची निवड केली जाईल. आमिर केवळ या चित्रपटाचा निर्माता आणि डिझाईनर असेल. खरे तर ‘महाभारत’त आमिरला कृष्णाची भूमिका साकारायची होती. पण तो कृष्ण साकारणार, या बातमीनेचं वादाचे ढग जमू लागले होते.  आमिर या चित्रपटात कृष्णाची भूमिका साकारणार, यावरून फ्रेंच वंशाचे राजकीय लेखक-विश्लेषक फ्रेंकॉइस गॉतियर यांनी एक  ट्वीट केले होते आणि या एका  ट्वीटनंतर संपूर्ण देशभर वादविवाद सुरु झाला होता. आमिर खान एक मुस्लिम असताना त्याला हिंदुंच्या सर्वाधिक प्राचीन आणि चर्चित महाकाव्यात कृष्णाची भूमिका साकारण्याची संधी का मिळावी? काय,भाजपाही धर्मनिरपेक्षतेच्या नावावर काँग्रेसच्याच वाटेवर निघालीयं? काय मुस्लिम एका हिंदूला मोहम्मदची भूमिका साकारू देतील? , असे  ट्वीट गॉतियर यांनी केले होते़ त्यांच्या या  ट्वीटनंतर आमिरच्या चाहत्यांनी त्याच्या बाजूने या वादात उडी घेतली होती. इतकेच नाही तर बॉलिवूड गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनीही आमिरला पाठींबा देत, गॉतियर यांच्या  ट्वीटवर तीव्र आक्षेप नोंदवला होता. तू पीटर ब्रूक्सच्या प्रॉडक्शनमध्ये बनलेला ‘महाभारत’ पाहिला नाहीयेसं का? मला माहितीयं की, असे विचार पसरवण्यासाठी तुम्हाला कोणत्या विदेशी संस्थेकडून रसद पुरवली जाते,  असे  ट्वीट जावेद अख्तर यांनी केले होते.