Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानने आपला मुलगा आझादसोबत घेतला आंब्याचा आस्वाद, त्यावरूनही यूजर्सने केलं ट्रोल; पण का...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 16:56 IST

Aamir Khan:आमिर खानच्या टीमने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यामध्ये तो मुलगा आझादसोबत आंब्याचा आस्वाद घेताना दिसत आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) कामाच्या बाबतीत जितका गंभीर असतो. तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद लुटताना दिसतो. तसेच खासगी आयुष्य एन्जॉय करताना दिसतो. आमिर खानच्या टीमने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यामध्ये तो मुलगा आझाद(Azad)सोबत आंब्याचा आस्वाद घेताना दिसत आहे. आमिर आणि आझाद मोठ्या आनंदाने या रसाळ आंब्यांवर ताव मारताना दिसत आहेत आणि हे फोटो शेअर करून त्यांच्या टीमने लिहिले, तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला आंब्याची पार्टी दिली आहे का?

आमिर आणि आझाद दोघांनीही राखाडी रंगाचा टी-शर्ट घातला आहे आणि त्यांच्या समोर टेबलावर आंब्याची मोठी प्लेट ठेवलेली आहे. त्यांच्या मागे बुक शेल्फवरही अनेक पुस्तके दिसत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये एका नेटकऱ्याने लिहिले की, तुम्ही आंबे कितीला आणले? त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले- तुम्हीही आंबे चोखून खाता का?

एका युजरने लिहिले की, आम्ही अजून आंबा पार्टी केलेली नाही पण आझाद आणि त्याच्या वडिलांना आंबा पार्टी करताना पाहणे देखील एक ट्रीट आहे.  वर्क फ्रंट व्यतिरिक्त आमिर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. आमिर खान लवकरच लाल सिंग चड्ढा चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :आमिर खान