Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मराठी भाषा येत नसल्याची लाज वाटली आणि मग...", आमिर खाननं सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:20 IST

मराठीप्रेमी आमिर खान! मराठी येत नसल्याने वाटली होती लाज, मग थेट चार वर्ष...

Aamir Khan On Marathi Language: बॉलिवूडचं केंद्रस्थान असलेल्या मुंबईत देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले अनेक बॉलिवूड कलाकार वर्षानुवर्षं राहत आहेत. आता मुंबई हेच त्यांचं घर झालं आहे. अनेकांना कर्मभूमी मुंबईप्रती प्रेम आहे. त्यामुळे काही जण आत्मीयतेनं मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात. मराठी ही केवळ स्थानिक भाषा नसून मुंबईच्या संस्कृतीचा भाग आहे, हे समजून अनेक कलाकार तिचा सन्मान ठेवतात. यामध्ये बॉलिवूड अभिनेता आमिर खानचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. आमिर हा मराठीमधून संवाद साधण्याचा आपण कायम प्रयत्न करत असतो. नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्यानं मराठी कधी शिकली, याबद्दल सांगितलं.

आमिर खान याने ४४ व्या वर्षी मराठीचे धडे घेतले आहेत. नुकतंच 'मॅशेबल इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मराठी भाषेबद्दल बोलताना आमिर खान म्हणाला, "मला थोडं थोडं मराठी बोलता येत. जेव्हा मी ४४ वर्षांचा होतो तेव्हाची गोष्ट आहे, आता तर मी ६० वर्षांचा आहे. ही १५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा एक दिवस मला जाणवलं की मला हिंदी बोलता येतं. इंग्रजी बोलता येते. पण मराठी बोलता येत नाही. जेव्हा कोणी मराठीत बोलतात तेव्हा मला काही समजत नव्हतं. माझी मातृभाषा उर्दू आहे ती मला बोलता येते, पण वाचता येत नाही. तेव्हा माझी राज्यभाषा मराठी मला बोलता येत नसल्याची लाज वाटली. त्यामुळे तेव्हा मी मराठी शिकलो".

आमिरनं सांगितलं की,  "मी मराठी शिकण्यासाठी शिक्षकांची मदत घेतली. सुहास लिमये यांनी मला मदत केली. त्यांनीच मला मराठीचे धडे दिले. सुरुवातीला मी किरण, जुनैद आणि आयरा चौघेही मराठी शिकायला बसायचो. पण त्यांच्यातील एकाएकाने हळूहळू माघार घेतली. मी मात्र चार वर्षे सुहास यांच्याकडे मराठी शिकलो. जेव्हा सुहास लिमये आणि मी मराठी शिकण्यासाठी भेटायचो, तेव्हा आम्ही खूप विषयांवर गप्पा मारायचो", असं आमिरनं म्हटलं. 

आमिरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या आगामी चित्रपट 'सितारे जमीन पर'मुळे चांगलाच चर्चेत आहे.  'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) २० जून २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख देखील झळकणार आहे. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट २००७ साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल 

टॅग्स :आमिर खानमराठीसेलिब्रिटी