Join us

आमिर खानचा लेक जुनैद डेब्यू सिनेमा करणार साऊथच्या हिरोईनसोबत रोमांस?, रंगली अशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 15:20 IST

आमिर खानचा मुलगा जुनैद त्याच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद त्याच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता अशी बातमी येते आहे की, जुनैद पहिल्या सिनेमात 'अर्जुन रेड्डी'मध्ये अभिनेत्री शालिनी पांडेसोबत रोमांस करताना दिसणार आहे. 'अर्जुन रेड्डी' या सिनेमात शालिनीच्या अपोझिट दक्षिण सुपरस्टार विजय देवरकोंडा होता.

ईडी टाईम्सच्या रिपोर्टनुसार, जुनैदच्या डेब्यू सिनेमात रणवीर सिंगच्याृ 'जयेशभाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी शालिनी असणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्रा ​​जुनैदच्या डेब्यू सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.

जुनैदच्या डेब्यू सिनेमा शिवाय शालिनी पांडेने यशराज फिल्मसचे तीन सिनेमा साईन केले आहेत. आमीर खानच्या मुलाच्या डेब्यू चित्रपटाचे नाव अद्याप फायनल झालेले नाही. अशी चर्चा आहे की शालिनी आणि जुनैद व्यतिरिक्त अभिनेत्री शवरी वाघही या सिनेमात झळकणार आहेत. यापूर्वी काही मीडिया रिपोर्ट्सने दावा केला होता की जुनैद यशराज फिल्म्सद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार नाही. मात्र, नंतर हा दावा खोटा ठरला आणि जुनैद यशराज फिल्म्ससच्या सिनेमातूनच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

असे म्हटले जाते आहे की, जुनैदने आपल्या सिनेमासाठीच ट्रेनिंग सुरू केले आहे. सिनेमा 2021 मध्ये फ्लोअरवर येण्याची शक्यता आहे. अद्याप या सिनेमाविषयी कोणतीही अधिकृत घोषणा झालेले नाही. 

टॅग्स :आमिर खान