Join us

"त्यांनी खूप मोठी चूक केली", 'सिंघम अगेन'बाबत आमिरचं मोठं वक्तव्य, 'भूल भुलैय्या ३'च्या दिग्दर्शकाला म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 15:59 IST

आमिर खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो 'भूल भुलैय्या ३'चे दिग्दर्शक अनिस बाझमी यांच्याबरोबर बोलताना दिसत आहे. या व्हिडिओत आमिरने 'सिंघम अगेन'च्या निर्मात्यांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

बॉलिवूडमधील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैय्या ३' हे दोन बिग बजेट सिनेमे दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित करण्यात आले. अजय देवगण आणि कार्तिक आर्यनच्या या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धमाकाच केला. या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सिंघम अगेन आणि 'भूल भुलैय्या ३'चे शो हाऊसफूल झालेले पाहायला मिळाले. पण, एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने या दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर त्याचा फटका बसला. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत अजय देवगणच्या सिंघम अगेनपेक्षा कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैय्या ३' वरचढ ठरत आहे. याबाबतच आमिर खानने वक्तव्य केलं आहे. 

आमिर खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो 'भूल भुलैय्या ३'चे दिग्दर्शक अनिस बाझमी यांच्याबरोबर बोलताना दिसत आहे. या व्हिडिओत आमिरने सिंघम अगेनच्या निर्मात्यांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 'भूल भुलैय्या ३'सोबत क्लॅश करणं सिंघम अगेनला भारी पडल्याचं आमिर म्हणत आहे. "त्यांनी तुमच्या 'भूल भुलैय्या ३'बरोबर टक्कर घेऊन चूक केली", असं आमिर अनिस बाझमी यांना म्हणत आहे. आमिरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, सिंघम अगेन सिनेमातून रोहित शेट्टीने अख्खं बॉलिवूडच मोठ्या पडद्यावर उतरवलं आहे. या सिनेमात अजय देवगण, करीना कपूर, अर्जुन कपूर, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण अशी स्टारकास्ट आहे. रोहित शेट्टीच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत २३०.७५ कोटींची कमाई केली आहे. तर 'भूल भुलैय्या ३' सिनेमाने २३१ कोटींचा गल्ला जमवला आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, विद्या बालन, तृप्ती डिमरी हे कलाकार आहेत. 

टॅग्स :आमिर खानअजय देवगणकार्तिक आर्यन