Join us

आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत', अर्जुनच्या भूमिकेसाठी 'या' अभिनेत्याला मिळाली ऑफर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 15:34 IST

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात आमिर खानने 'महाभारत' सिनेमावर भाष्य केलं होतं.

अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) भारतीय सिनेमाच्या इतिहासात अनेक क्लासिक सिनेमे दिले आहेत. 'रंग दे बसंती','लगान','तारे जमीन पर','दिल चाहता है' अशा अनेक सिनेमांची नावं घेता येतील. त्याच्या सिनेमांचा दर्जा पाहता त्याला 'द परफेक्शनिस्ट' अशी ओळखही मिळाली आहे. आमिर खानचा 'महाभारत' हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. लवकरच तो या प्रोजेक्टवर काम सुरु करणार आहे. दरम्यान सिनेमात अर्जुनच्या भूमिकेसाठी एका अभिनेत्याला ऑफर दिली गेली आहे. कोण आहे तो अभिनेता?

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात आमिर खानने 'महाभारत' सिनेमावर भाष्य केलं होतं. तो म्हणाला होता की, "महाभारत प्रोजेक्ट हे माझं स्वप्न आहे. मात्र हे फार कठीण आहे. महाभारत कधीच तुम्हाला खाली पडू देत नाही पण आपल्याकडून प्रोजेक्ट पडू नये अशी मला भीती वाटते. म्हणूनच मी खूप लक्ष देऊन यावर काम करत आहे." तसंच आमिरला यामध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारायची इच्छा आहे असंही त्याने बोलून दाखवलं होतं. आता सिनेमात अर्जुनच्या भूमिकेसाठी अभिनेता अल्लू अर्जुनला (Allu Arjun) ऑफरला अप्रोच केल्याची चर्चा आहे. नुकतंच अल्लू अर्जुनने आमिरची मुंबईतील घरी भेटही घेतली होती. त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. अल्लने 'महाभारत' सिनेमासाठीच भेट घेतल्याचा अंदाज सगळे लावत आहेत. 

अद्याप अल्लू अर्जुनने यावर कन्फर्मेशन दिलेलं नाही. तसंच आमिरच्या टीमकडूनही काही सांगण्यात आलेलं नाही. मात्र 'महाभारत'ची कास्ट तगडी असणार यात शंका नाही. आमिर खूप लक्षपूर्वक या सिनेमावर काम करणार आहे त्यामुळे सिनेमाच्या रिलीजला बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसंच सिनेमा दोन भागांमध्ये बनणार आहे.

अल्लू अर्जुन 'पुष्पा' आणि 'पुष्पा ' मध्ये राऊडी अवतारात दिसला. सध्या तो अॅटलीच्या आगामी सिनेमाच्या तयारीत व्यग्र आहे. शिवाय त्याचा 'आयकॉन' हा सिनेमाही येणार आहे. 

टॅग्स :आमिर खानअल्लू अर्जुनमहाभारत