Aamir Khan: 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानने १९८८ मध्ये आलेल्या 'कयामत से कयामत तक' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तो त्याच्या पहिल्याच चित्रपटातून स्टार बनला. तेव्हापासून आमिरची जादू आजही कायम आहे. आमिर खानच्या दंगल, पीके, राजा हिंदुस्तानी, गजनी या चित्रपटांनी प्रचंड कमाई केली आहे. आमिर खानचा 'दंगल' (Dangal) हा चित्रपट केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीतही सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने २ हजार कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती, परंतु या चित्रपटात 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिरकडून एक मोठी चूक झाली होती. जी कोणाच्याही लक्षात आली नाही. पण 'शहेनशाह' अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) यांनी ती चूक हेरली. ती चूक काय होती, हे आपण जाणून घेऊयात.
आमिर खानचा 'दंगल' चित्रपट आजही प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने पाहतात. सहसा प्रेक्षकांच्या नजरेतून कोणतीही चूक सुटत नाही. पण, 'दंगल' चित्रपटात आमिर खानकडून झालेली मोठी चूक प्रेक्षकांच्याही लक्षात आली नाही. पण, ही चूक फक्त अमिताभ बच्चन यांनी पकडली. याबद्दल आमिरनेच खुलासा (Aamir Khan On His Performance In Dangal)केला आहे.
खरं तर, अलीकडेच मुंबईतील रेड लॉरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये आमिर खान त्याचा पहिला चित्रपट 'कयामत से कयामत तक' च्या विशेष स्क्रीनिंगला पोहोचला होता. यावेळी 'दंगल' चित्रपटाबद्दल तो म्हणाला, "'दंगल' हा मी सर्वोत्तम अभिनय दिलेला चित्रपट आहे. पण चित्रपटातील एका शॉटमध्ये मी चूक केली होती आणि अमिताभ बच्चन इतके हुशार आहेत की त्यांनी ती चूक पकडली. जेव्हा मी त्याला विचारलं की तुम्हाला चित्रपट कसा वाटला? तर ते म्हणाला "खूप चांगले होता, पण, एका सीनमध्ये तू भूमिकेतून बाहेर आला होतास".
आमिरनं जेव्हा विचारलं की कोणता शॉट तर आमिताभ यांनी सांगितलं की, कुस्तीच्या एका शॉटमध्ये आमिर हा 'येस' म्हणाला होता'. आमिर म्हणाला की, "त्याची जी महावीर फोगटची भूमिका होती, ती 'येस' बोलू शकत नव्हती. त्या भूमिकेनं वाह किंवा शाब्बास सारखं काही बोलायला हवं होतं. 'येस' ही इंग्रजी किंवा मुंबईची भाषा आहे. तो एकच शॉट एडिटमध्ये राहिला आणि मला पण त्याविषयी नंतर जाणवलं".